राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदस्य नोंदणीला चालना देण्याचा निर्धार - जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 1 June 2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदस्य नोंदणीला चालना देण्याचा निर्धार - जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील



किनवट (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष स्वप्निल भाऊ इंगळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किनवट तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार पडली. तालुक्यात युवक संघटनेची घडी मजबूत करण्यासाठी आणि अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा ठोस कार्यक्रम यावेळी ठरविण्यात आला.


या बैठकीचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट तालुका अध्यक्ष संजय भाऊ सिडम आणि नांदेड जिल्हा सरचिटणीस विशाल भाऊ जाधव यांनी केले होते. बैठकीदरम्यान तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्यत्व वाढवण्यावर भर देण्यात आला. आगामी काळात युवकांमध्ये अधिक जोमाने काम करत संघटनेचे नेटवर्क वाढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.


या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुगत नगराळे, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ खरपुडे पाटील, माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इशा खान साहेब, मोनू गायकवाड, विकी शेंडे, मोहनभाई शेख, किनवट शहराध्यक्ष इलियास मोहम्मद, नवीन जाधव, चेतन मुंडे, माजी नगरसेवक इम्रान खान, समीर जायभाय, निखिल डांगे, बंटी गोरे, लकी राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही युवकांसाठी संघर्ष करणारी चळवळ आहे. गावपातळीपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत युवकांना संघटित करून शाश्वत नेतृत्व निर्माण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अजित दादांचे नेतृत्व राज्यात सक्षम आहे आणि त्यांच्या योजना योग्य पद्धतीने ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी पुढे यावे."


बैठकीच्या शेवटी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार केला. युवकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment

Pages