आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन तसेच वसतिगृहातील विद्यार्थी यांच्या पुढाकाराने चेंबूरमध्ये एकहजार विद्यार्थी क्षमता असलेल्या नवीन वसतिगृहाचा आज उदघाटन सोहळा पार पडणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 26 June 2025

आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन तसेच वसतिगृहातील विद्यार्थी यांच्या पुढाकाराने चेंबूरमध्ये एकहजार विद्यार्थी क्षमता असलेल्या नवीन वसतिगृहाचा आज उदघाटन सोहळा पार पडणार


 मुंबई (प्रतिनिधी) :- 

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित व "सामाजिक न्याय दिवस" चे औचित्य साधून आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन आणि वसतिगृहातील विद्यार्थी यांच्या पुढाकाराने चेंबूरमध्ये 1000 विद्यार्थी क्षमता असलेल्या नवीन वसतिगृहाचा दिनांक आज रोजी उदघाटन सोहळा पार पडणार आहे. 

गेली कित्येक महिने झाले चेंबूर मध्ये 1000 विद्यार्थी क्षमता असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची संपूर्ण प्रकिया पूर्ण झाली आहे,पण अद्यापही हे नवीन वसतिगृह चालू झालेले नाही आणि त्याचा विपरीत परिणाम हा खेडोपाड्यातून शिक्षण घेण्यासाठी मुबंई मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रचंड शैक्षणिक नुकसान होताना आपल्याला दिसत आहे.


मा. मंत्री महोदयांना वसतिगृहाचे उदघाटन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने अखेर आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन आणि वसतिगृहातील विद्यार्थी यांच्या पुढाकाराने आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित व "सामाजिक न्याय दिवस" चे औचित्य साधून दिनांक 26/6/2025 रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, नवीन इमारत, चेंबूर याठिकाणी या नवीन वसतिगृहाचा उदघाटन समारंभ सोहळा पार पडणार आहे.

 

खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या वसतिगृहातील विद्यार्थ्याना हे नवीन वसतिगृह चालू करून देऊन त्यांना खरा सामाजिक न्याय मिळेल अशी माहिती आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रा.रोहित कांबळे यांनी दिली आहे..


तसेच नवीन वसतिगृह चालू होतं असल्याने भविष्यात अनेक विद्यार्थी या वसतिगृहातुन घडतील आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील मोक्याच्या व माऱ्याच्या जागा काबीज करतील अशी प्रतिक्रिया विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व लिपारे यांनी दिली आहे.


या उदघाटन समारंभासाठी विविध आंबेडकरी विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages