खाजगी रुग्णालयांनि प्रथम दर्शनी भागात सेवाशुल्क आकारणीचे दर पत्रक लावणे बंधनकारक मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या पाठपुराव्याला यश... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 12 July 2025

खाजगी रुग्णालयांनि प्रथम दर्शनी भागात सेवाशुल्क आकारणीचे दर पत्रक लावणे बंधनकारक मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या पाठपुराव्याला यश...

नांदेड : 

 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उच्चाराला अनुसरून मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी खाजगी रुग्णालयाकडून शुल्क आकारणीच्या नावाखाली रुग्णांची लूट होत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सह जिल्हा शल्यचकित्सक नांदेड यांच्याकडे खाजगी रुग्णालयात प्रथमदर्शनी शुल्का करण्याचे दर पत्रक लावण्या साठी म्हणून निवेदन देण्यात आले होते निवेदनात नमूद मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांकडून जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक (सर्व) उपजिल्हा रुग्णालय  व ग्रामीण रुग्णालय अधिनस्त सर्व खाजगी रुग्णालयांना प्रथमदर्शनी भागात दर पत्रक लावणे बंधनकारक शासन आदेश असताना देखील अद्याप पर्यंत अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी दिनांक.26/3/ 2025. मा. जिल्हाधिकारी  जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड

यांना भेटून खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी शुल्क ते इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या शुल्कामध्ये खाजगी रुग्णालयाकडून मनमानी शुल्क आकारला जात असल्याची सर्व माहिती निवेदनाद्वारे देऊन चर्चेच्या माध्यमातून रुग्णांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी म्हणून माननीय महोदयाच्या निदर्शनात आणून दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक. 20/6/2025 रोजी  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात पत्र निर्गमित करून देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने वारंवार रुग्णांची शुल्कातून लूट तसेच हेळसांड खाजगी रुग्णालयास मनमानी शुल्काला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वरील जिल्हाधिकारी सह जिल्हा शल्य चिकित्सांकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना प्रथमदर्शी फलक लावण्यासाठी म्हणून  उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय कार्यरत कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिनांक.03/07/ 2025. रोजी ज्याचे जावक क्रमांक जा.क्र.BNH/8157/2025 पत्रान्वये कारवाईस्तव सूचना देण्यात आल्या सर्व खाजगी रुग्णालयात  सुश्रुशागृहात दर पत्रक प्रदर्शित करण्याबाबत महाराष्ट्र  सुश्रुपाशगृहे नोंदणी (सुधारित)नियम 2021 मधील नियम 11(q)(आय) या शासन निर्णय अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या तालुक्याच्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालय चालकांना रुग्णालयाच्या मुख्य दर्शनी भागात ठळकपणे दरपत्रक प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना देऊन दरपत्रक प्रदर्शित झाल्याची खातर जमा करून अनुपालन अहवाल सादर करावा

 शुश्रूषागृहात प्रदर्शित करावयाचे दरपत्रक खालील प्रमाणे आहेत 1)प्रवेश शुल्क.

2)प्रतिदिन अंतररुग्ण दर (खात/ अतिदक्षता कक्ष) 3)वैद्यकीय शुल्क(प्रति भेट) 

4)सहायक वैद्यकीय शुल्क (प्रति भेट)

 5)भूल शुल्क (प्रति भेट) 6)शस्त्रक्रियागृह शुल्क.

7) शस्त्रक्रिया गृह सहाय्यक शुल्क 

8)भुलसायक शुल्क

 9)सुश्रुषा शुल्क (प्रतिदिन) 10)सलाईन व रक्त संक्रमण शुल्क

11) विशेष भेट शुल्क 12)मल्टीपेरा मॉनिटरिंग शुल्क

13) पॅथॉलॉजी शुल्क 14)ऑक्सिजन शुल्क 

15) रेडिओलॉजिंग व सोनोग्राफी शुल्क. 

वरील सर्व सेवा शुल्क प्रथमदर्शनी लावण्यास बंधनकारक केले आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खाजगी रुग्णालयां मध्ये उपचार घेण्यासाठी गेल्यास रुग्णालयात दरपत्रक वाचून सेवा शुल्क शुल्काची शहानिशा करून उपचार घ्यावेत व तसेच रुग्णालयात प्रथमदर्शनी  दर पत्रक निदर्शनात न आल्यास रुग्णालयात प्रशासनास दरपत्रक लावण्या सांगावे न लावल्यास संबंधित वैद्यकीय अधीक्षकांकडे खाजगी रुग्णालयाची तक्रार करावी असे आव्हान मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास जात असलेल्या रुग्णांना जागरूक राहुन उपचार घेण्याचे आव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages