किनवट,दि.११ : किनवट न्यायालयातील सरकारी वकील अशोक पोटे यांची येथील आठ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अकोला येथील न्यायालयात नुकतीच बदली झाली आहे.यानिमित्त त्यांना वकील संघातर्फे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला.अध्यस्थानी दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश के.एस.मेंढे हे उपस्थित होते.
यावेळी वकील संघातर्फे जेष्ठ वकील के.एस.काजी यांनी अशोक पोटे यांना पुष्पहार घालून,शाल पांघरुन व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला.यावेळी सर्व वकीलांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात ॲड.दिलिप काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व पुढील वाटचालीसाठी अशोक पोटे यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.टेकसिंग चव्हाण, सचिव ॲड.माझ बडगुजर,सहसचिव ॲड.मुसळे, कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमास वकील,न्यायालयीन कर्मचारी,पक्षकार यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment