प्रा.शिलवंत रमेश गोपनारायण यांना पीएच.डी प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 10 July 2025

प्रा.शिलवंत रमेश गोपनारायण यांना पीएच.डी प्रदान


छत्रपती संभाजीनगर : 

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विद्यार्थी- प्राध्यापक नेतृत्व प्रा.शिलवंत रमेश गोपनारायण यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्यांच्या संशोधनाचा विषय "अ कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ द जर्नल्स पब्लिश बाय अमेरिकन लायब्ररी असोसिएशन (ALA)". हा असून त्यांनी डॉ.मधुकर गरड, सेवानिवृत्त ग्रंथपाल अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले आहे, दिनांक ८/७/२०२५ रोजी त्यांना पीएच.डी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली, पदवी प्राप्त झाल्यानंतर ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाग प्रमुख वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वैशाली खापर्डे मॅडम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी डॉ. मिलिंद आठवले, सुरज तायडे, अमित साळवी, विकास सोनवणे, रामदास हिवाळे, अंकुश गवई, सोनाजी गवई, संतोष अंभोरे, अँड. सचिन निकाळजे, श्रीकांत पातोडे, विशाल पठारे यांच्यासह विभागातील सर्वच विद्यार्थी व कर्मचारी तसेच मित्रमंडळी यांनी गोपनारायण यांचे अभिनंदन  केलं केलं. 


      डॉ. शिलवंत गोपनारायण हे अकोला जिल्ह्याचे मूळ रहिवासी असून विद्यार्थी-प्राध्यापक चळवळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ते सक्रिय सहभाग नोंदवणारे प्राध्यापक आहेत, त्यांनी आपल्या या पदवीचे व यशाचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या व विचाराच्या प्रेरणेला तसेच त्यांचे आई वडील, लहान मोठे भाऊ वहिनी, आत्ता परिवार, गुरुजन वर्ग, सहकारी मित्र व त्यांचे राजकीय गुरू डॉ. अरुण शिरसाट यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages