बौद्ध महासभेच्या अध्यक्षस्थपदी अभियंता प्रशांत ठमके,तर सचिवपदी महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 7 July 2025

बौद्ध महासभेच्या अध्यक्षस्थपदी अभियंता प्रशांत ठमके,तर सचिवपदी महेंद्र नरवाडे

किनवट : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या अध्यक्षपदी  अभियंता प्रशांत ठमके यांची फेरनिवड  करण्यात आली आहे,तर तालुका सरचिटणीस म्हणून बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांची निवड करण्यात आली.

   भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे व जिल्हा हिशोब तपासणीस अप्पाराव येरेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या  नुकत्याच झालेल्या  बैठकीत तालुका शाखेची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली.

     अध्यक्ष-अभियंता प्रशांत ठमके, सरचिटणीस -बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, कोषाध्यक्ष -भारत कावळे, उपाध्यक्ष (संस्कार )-बौद्धाचार्य अनिल उमरे, उपाध्यक्ष (पर्यटन व प्रसार) -सुरेश पाटील, उपाध्यक्ष (संरक्षण) -राजु कांबळे,कार्यालयिन सचिव -दिलीप भगत, हिशोब तपासणीस -वसंत सर्पे, संस्कार सचिव -प्रा.सुभाष गडलिंग, संस्कार सचिव -पांडुरंग भालेराव, पर्यटन व प्रसार सचिव -किशन कयापाक, पर्यटन व प्रसार सचिव -कैलास पाटील, संरक्षण सचिव- राहुल घुले, संरक्षण सचिव-राहुल उमरे ,संघटक -प्राचार्य राजाराम वाघमारे, संघटक -भगवान मुनेश्वर, संघटक -अमृत पाटील, संघटक -सोमा पाटील, संघटक -रमेश मुनेश्वर, संघटक -कैलास भरणे , संघटक -प्रकाश कांबळे




  बैठकीची सुरुवात प्रतिमा पुजनाने  व बुद्ध वंदनेने करण्यात आली प्रास्ताविक प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी केले.सूत्रसंचालन बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी केले, तर बौद्धाचार्य सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी तालुक्यातील अनेक उपासक उपस्थित होते.सरनतय गाथेने  कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Pages