विधी सेवा प्राधिकरण चे सचिव शरद देशपांडे यांची वकील संघाला सदिच्छा भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 25 July 2025

विधी सेवा प्राधिकरण चे सचिव शरद देशपांडे यांची वकील संघाला सदिच्छा भेट



किनवट,दि.२५: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव आणि माजी जिल्हा न्यायाधीश शरद देशपांडे यांनी किनवट न्यायालयातील वकील रुमला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

        यावेळी वकील संघाच्या वतीने अध्यक्ष 

ॲड.किशोर मुनेश्वर व जेष्ठ वकील एस.डी.रोठोड यांनी श्री.देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी श्री.देशपांडे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या कामासंदर्भाने सविस्तर अशी माहिती दिली. दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने,वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.टेकसिंग चव्हाण, सचिव ॲड.माज बडगुजर,सहसचिव ॲड.सुरेश मुसळे, कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे, ग्रंथपाल व्ही.बी.कानिंदे, ॲड.जी.एस.रायबोळे,ॲड.हरीभाऊ दर्शनवाड यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ वकीलांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन ॲड.विलास शामिले यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages