किनवट,ता.२६ (बातमीदार) : तीन वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील प्रभागरचनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार २०१७ मधील जुन्याच ६ गट व १२ गण रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. मात्र, एक महत्त्वाचा बदल म्हणजे, उमरीबाजार गट रद्द करून त्याऐवजी अधिक लोकसंख्येच्या आधारे सारखणी गटास मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार गटाचे नाव त्याअंतर्गत प्रमुख गावांतील सर्वात जास्त लोकसंख्येच्या आधारे निश्चित
केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार उमरीबाजारची लोकसंख्या २ हजार ८६१ असून सारखणीची ३ हजार २५० आहे. त्यामुळे सारखणीस स्वतंत्र गट मान्यता मिळाली आहे. पूर्वी २०२२ साली नियोजित निवडणुकीसाठी मोहपूर नावाचा नवीन गट निर्माण करण्यात आला होता. परंतु, निवडणुका झाल्याच नाहीत. त्यामुळे तो बदल रद्द मानण्यात आला आहे. यामुळे आगामी निवडणुका २०१७ च्या मूळ रच-नेनुसारच होणार आहेत.
||६ गट व १२ गणांतर्गत ग्रामपंचायती|| सारखणी गट व गण: सारखणी, मोहपूर, मारेगाव (वरचे/खालचे), कनकवाडी, माळबोरगाव,पांधरा, आंजी, बेल्लोरी ज., सिंदगी मो., निचपूर, राजगड, वडोली, सलाईगुडा. दहेली गण : दहेली, उमरी बा., निराळा, निर-ाळातांडा, टेंभी, वझरा बु., दरसांगवी सि., गौरी, चिंचखेड, मोहाडा, धानोरा सि., धावजी नाईक तांडा, दुंड्रा, रामपूर.
मांडवी गट व गण: मांडवी, जवरला, सिंगोडा, पाटोदा बु., परसरामनाईक तांडा, पळशी, पिंपळगाव सि., अंबाडी, अंबाडी तांडा. कोठारी सि. गण: कोठारी सि., लिंगी, उनकदेव, पिंपळशेंडा, बोथ, सक्रुनाईक तांडा, पार्टी सि., खंबाळा, पाथरी, शिरपूर, नागापूर, कनकी, जरूर, जरूरतांडा, भिलगाव.
गोकुंदा गट व गण : गोकुंदा, कोठारी चि., मदनापूर चि., प्रधानसांगवी, शनिवार पेठ, भुलजा, दाभाडी, दरसांगवी. मांडवा कि. गण: मांडवा कि., धामनदरी, राजगडतांडा, लोणी, कमठाला, मलकापूर, भीमपूर, पिंपळगाव कि., घोगरवाडी, घोटी, दिगडी मं., नागझरी. बोधडी बु. गट व गण : बोधडी बु., कोपरा, येंदापेंदा, पार्डी खु., बोधडी खु. चिखली बु. गण चिखली बु., बेंदी, बेंदीतांडा, आमडी, बुधवारपेठ, मलकवाडी, आंदवोरी चि., देवलानाईक तांडा, चिखली खु., दहेगाव, पाटोदा खु., मरकागुडा, सिंगारवाडी.
जलधारा गट व गण: जलधारा,सावरी, थारा, पिंपरफोडी, वेल्लोरी धा., माळकोल्हारी, डोंगरगाव, दिग्रस, सावरगाव. परोटी तांडा गण: परोटी, रिठा, नंदगाव तांडा, नंदगाव, कुपटी बु./खु., इरेगाव, तल्हारी, वाळकी बु., रोडानाईक तांडा, भंडारवाडी, पिंपरी
इस्लापूर गट व गण : इस्लापूर, कोल्हारी कोसमेट, भिसी, करंजी इ., पांगरी, मूळझरा. शिवणी गण शिवणी, दयालधानोरा, गोंडजेवली, फुलेनगर, अप्पारावपेठ, मलकजाम तांडा, पांगरपहाड, कंचेली इ., आंदबोरी इ., चिखली इ., गोंडेमहागाव, मारलागुंडा, तोटंबा, मानसिंगनाईक तांडा, दीपलानाईक तांडा.
No comments:
Post a Comment