नांदेड दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पाऊस होत आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा-2025 ही 28 सप्टेंबर ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजे रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सर्व परिक्षार्थी उमेदवारांनी या परीक्षेच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत दोन सत्रात घेण्यात येणार होती. परंतू महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे काही परिक्षार्थी यांना या परिक्षेस बसता आले नसते व परिक्षेस मुकावे लागले असते.
याबाबत नांदेड जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरुन नांदेडला ही परीक्षा देण्यासाठी येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याबाबत शुध्दीपत्रक 26 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment