महाविद्यालयांकडून अन्यायकारक शुल्क वसुली त्वरित थांबवा - अक्रम खान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 September 2025

महाविद्यालयांकडून अन्यायकारक शुल्क वसुली त्वरित थांबवा - अक्रम खान


औरंगाबाद : 

  सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वात उच्च शिक्षण सहसंचालक यांची भेट घेऊन मुलींच्या शैक्षणिक शुल्क माफीवर काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक शुल्क वसुली करत आहे ती त्वरीत थांबवण्यात  यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले .

राज्य सरकारने मुलींसाठी शैक्षणिक शुल्क माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला असताना काही महाविद्यालये शासन आदेशाकडे दुर्लक्ष करून मुली विद्यार्थिनींकडून सक्तीने शुल्क वसूल करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

हा प्रकार शासनाच्या निर्णयाला हरताळ फासणारा असून विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकणारा आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :

1️⃣ शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना तातडीने पत्र काढावे.

2️⃣ सक्तीने वसूल केलेले शुल्क परत करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात.

3️⃣ शासन निर्णय न पाळणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कार्यवाही करावी.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचे रक्षण व्हावे आणि शासनाच्या निर्णयाचा योग्य फायदा प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावा, हीच आमची अपेक्षा आहे.

यावेळी शरीक काझी, अर्शिया कुरेशी, बेग साइमा, सैय्यद बुशरा, तुबा रहनम, उम्ममा,अलमीरा, मेहविश, सैय्यद अहसना अमोल बोर्डे ,जैद,खान साद पटेल , फैजल कुरैशी ,अमोल घुगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages