मुंबई :- महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन हजार रूपये देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी एकूण ४०.६१ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
या निर्णयाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीसांगितले की , अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व सणासुदीच्या काळात आनंदाचा क्षण निर्माण व्हावा म्हणून भाऊबीज भेट स्वरूपात शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी 'शक्ती' आहे. त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असे सांगितले.
या अनुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्यामार्फत भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल.
No comments:
Post a Comment