छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवात चार जिल्हयातून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
या संदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळाच्या बैठक कक्षात गुरुवारी (दि.२५) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संचालक डॉ.वैâलास अंभुरे, प्रसिध्दी समिती अध्यक्ष डॉ.संजय शिंदे यांची उपस्थिती होती. महोत्सवाचे उद्घाटन ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते शनिवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता विद्यापीठ नाटयगृहात होईल. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित राहील. तर कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, अॅड.दत्तात्रय भांगे, संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर समारोप व बक्षीस वितरण सभारंभही याच ठिकाणी होणार असून प्रख्यात अभिनेते वैभव मांगले, माजी विद्यार्थी तथा कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांची प्रमुख् अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.गौतम पाटील, डॉ.व्यंकटेश लांब यांची ही उपस्थिती राहणार आहे. महोत्सवाच्या तयारीसाठी २५ समित्या स्थापन करण्यात आल्या असून जवळपास दीडशे सदस्य, सल्लागार व संयोजन समिती सदस्य यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
२६२ संघ, १ हजार कलावंत
या महोत्सवात जिल्हानिहाय विजेते संघ तसेच ललित कला गटातील सर्व असे २६२ संघ सहभागी होणार आहेत. यापुर्वी ७ ते २० सप्टेंबर या काळात चार जिल्हा महोत्सव घेण्यात आले. केंद्रीय युवक महोत्सवात या संघातील विजेते एकुण १ हजार २१ कलावंत सहभागी होणार असून ५२७ मुली व ४९४ मुले आहेत. जिल्हानिहाय संघ व कलावंत पुढीलप्रमाणे आहेत.
• धाराशिव - ३४ संघ, १६३ कलावंत
• बीड - ५५ संघ, २३६ कलावंत
• जालना - ५८ संघ, २०८ कलावंत
• छत्रपती संभाजीनगर - ११५ संघ, ४१४ कलावंत
या प्रमाणे एकूण १०२१ कलावंत सहभागी होणार आहेत.
पाच गटात २८ कलाप्रकार
या महोत्सवात नृत्य, नाटय, संगीत, साहित्य आणि ललित कला अशा पाच गटात २८ कलाप्रकार सादर होणार आहेत. तसेच शोभायात्रा हा स्वंतत्र कलाप्रकारही असणार आहे. कला विभाग व कलाप्रकार पुढील प्रमाणे :-
१) संगीत विभाग - भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), नाटयसंगीत, भारतीय सुगम संगीत (भा), भारतीय समूहगान (भा), भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूहगाय.
२) नृत्य विभाग - भारती शास्त्रय नृत्य, लोकआदीवासी नृत्य
३) नाटय विभाग - एकांकिका, प्रहसन, नक्कल, मूकअभिनय
४) वाड्ःमय विभाग - वादविवाद, प्रश्नमंजूषा, वत्तृâत्व
५) ललित कला विभाग - रांगोळी, मृदमूर्तीकला, कोलाज, स्पॉट फोटोग्राफी, चित्रकला, पोस्टर, व्यंगचित्रकला, इन्स्टॉलेशन हे आठ कलाप्रकार असे एकून २८ कलाप्रकार सादर होणार आहेत, अशी माहिती संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment