छ. संभाजीनगर दि.२५ राज्यभरात आरक्षणावरून तणावपूर्ण परिस्थिती असतांना खा.सुप्रिया सुळे व लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक अनुसूचित जातींना लक्ष करत वादग्रस्त विधान करून आगीत तेल ओतत असल्याने त्यांना जिल्हाबंदी करून अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असा आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला आहे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक श्री राठोड यांच्या कडे देण्यात आले.
यावेळी राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अश्या वाचाल वीरांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्यावर १) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 तसेच, भारतीय दंड संहिता (IPC) संबंधित कलमान्वये (उदा. कलम (158 A- जातीय तेढ निर्माण करणे) गुन्हा दाखल करण्यात यावा. २) सदर व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत जिल्हाबंदी (Section 56) करण्यात यावे. अश्या मागण्या करण्यात आल्या
यावेळी प्राचार्य सुनिल वोककर, काकासाहेब गायकवाड, प्रा.सिद्धोधन मोरे, मिलिंद मोकळे, विनोद वाकोडे,
राहुन कानडे, राहुल गवळी,नितीन वाकेकर, अनिल हिवाळे, सुनिल पांडे, मिलिंद शिरसाठ, सचिन शिंगाडे, अतुल कंबळे, आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment