छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडणार आहे. डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकार व माध्यम तज्ज्ञांसाठी हा एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरणार असून, विविध विषयांवर विचारमंथन व नेटवर्किंगचा लाभ घेता येणार आहे.
उद्घाटन माननीय संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख राहणार आहेत. इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये अतुल सावे (इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य), तसेच परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ तुळशीराम भोईटे आणि रवींद्र पोखरकर यांचे मार्गदर्शन होणार असून, डिजिटल पत्रकारितेच्या पुढील वाटचालीसाठी चर्चासत्रे आणि अनुभव साझा करण्याची संधी मिळणार आहे. समारोप एस.एम. देखमुख यांच्या हस्ते होईल.
परिषदेच्या आयोजनासाठी किरण नाईक, शरद पाबळे, अनिल वाघमारे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे आणि इतर अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले आहेत. तसेच सुनील वाघमारे, बालाजी सूर्यवंशी, प्रकाश भगनुरे, कानिफ अन्नपूर्णे, महादेव जामनिक, ब्रम्हानंद चक्करवार यांसह महिला आघाडी व विभागीय कार्यकारिणी देखील कार्यक्रमासाठी सक्रिय आहे.
डिजिटल माध्यम क्षेत्राशी संबंधित पत्रकार, लेखक, संपादक व अभ्यासकांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांची देवाणघेवाण करावी, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment