निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.बालाजी कल्याणकर अलर्ट मोडवर धर्माबाद उमरी नायगाव तालुक्यातील ईच्छूक उमेदवारांनी दिल्या मुलाखती
नांदेड, जयवर्धन भोसीकर :
जवळपास गेल्या चार ते पाच वर्षा पासून खंडित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.त्या अनुषंगाने शिवसेनेचे (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे)आमदार बालाजी कल्याणकर हे अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहेत.त्यांनी आता नांदेड शहरासह तालुक्याच्या नगरपालीका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी समाज हिताचे घेतलेले निर्णय व शासनाने केलेली अमंलबजावणी पाहता शहरासह गाव खेड्यातील सामान्य जनता विशेषतः लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनेकडे आकर्षित झालेली आहे.
अशातच सर्व सामान्य जनतेच्या मणामनात पोहचलेले आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्यातील नायगाव,उमरी,धर्माबाद या शहरासह सदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारांच्या उलाखती घेतल्या आहेत.या मुलाखती दरम्यान आपल्याकडे अनेक विकासाचे मुद्दे असून जनतेला त्रास होऊ नये म्हणून शासन आपल्या दारी,लाडकी बहीण योजना यासह अनेक विकासाची कामे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला असून माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला जनतेचे प्रमाणिक काम केल्यामुळे दोन वेळेस महानगरपालिका नगरसेवक व दोन वेळेस आमदार होण्याचा मान जनतेच्या आशीर्वादाने प्राप्त झाला असून शिवसेना पक्ष जात पात मानत नसून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देते.त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावा व आपल्या पक्षाची ताकद प्रचंड वाढवावी काहीही अडचण आल्यास मी सदैव आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे अशी आमदार कल्याणकर यांनी ग्वाही दिली.यावेळी आमदार बालाजी कल्याणकर,गंगाधर बडूरे जिल्हाप्रमुख,मंगेश कदम जिल्हाप्रमुख,अपर्णा नेरलकर महिला जिल्हाप्रमुख,आकाश रेड्डी तालुकाप्रमुख, सुभाष पेरेवार तालुकाप्रमुख,प्रल्हाद पिंपळे उपजिल्हाप्रमुख,ज्ञानेश्वर बेलकर,शिवाजी पन्नासे, भानुदास पाटील, शिवाजी पवार शिवाजी शिंदे अनिल कमलाकर यांच्यासह धर्माबाद व उमरी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचे ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या कार्यप्रणालीवर खूष होऊन व सत्तेत राहिल्याशिवाय समाजाची कामे मार्गी लावून समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने श्री आनंदराज आंबेडकर हे आपल्या पक्षासोबत युती केल्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली असून शंभर टक्के आपले उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार.- मंगेश कदम जिल्हाप्रमुख शिवसेना एससी एसटी ओबीसी विभाग नांदेड.
लाडकी बहीण योजनेमुळे सामान्य गोरगरीब महिलांना प्रत्येकी दरमहा पंधराशे रुपये देण्याचे काम ना.शिंदे साहेबांनी चालू केल्यामुळे लाखो कुटुंबियातील लोकांना याची मोठी मदत होत असल्यामुळे महिला वर्गात लाडका भाऊ म्हणून एकनाथराव शिंदे यांना गोरगरीब सामान्य कुटुंबातील महिलांचा प्रचंड आशीर्वाद पाठिंबा आहे.-सौ.अपर्णा नेरलकर जिल्हाप्रमुख महिला आघाडी शिवसेना नांदेड.





No comments:
Post a Comment