पूरग्रस्त शेतकरी विद्यार्थ्यांसाठी ‘आंबेडकरवादी मिशन’कडून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग
नांदेड : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलीकडे झालेल्या पुरामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः नांदेड व मराठवाडा परिसरात पूरस्थिती अधिक बिकट होती. या पार्श्वभूमीवर पुरग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आंबेडकरवादी मिशन सिडको, नांदेड यांनी एक सामाजिक पुढाकार घेतला आहे.
एमपीएससी परीक्षा तसेच राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय आणि क वर्गाच्या पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिशनकडून निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. पुढील अडीच महिन्यांत या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना त्यासाठी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, छापील नोट्स आणि टेस्ट सीरिज या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या जातील. विशेष म्हणजे, या सुविधा सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील.
“पूरग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
📞 9326932049 / 9370753059
📍 आंबेडकरवादी मिशन, सिडको, नांदेड
No comments:
Post a Comment