लिंबगाव गटातून मधून भिमराव बुक्तरे यांची जोरदार तयारी ;
गाव भेटीवर भर मतदार संपर्क वाढवला
नांदेड , प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य यांचे आरक्षण जाहीर झाले असून शहरापासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद लिंबगाव गट हा अनुसूचित जाती सर्वसाधारण सुटला असून या ठिकाणावरून बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून गाव भेटीवर भर देत मतदाराशी संपर्क वाढवला आहे.
विविध प्रकारच्या आंदोलने,मोर्चे, सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवून ते सतत लोकांच्या संपर्कात राहतात. जनसामान्यांच्या कामासाठी सतत अग्रेसर असणारा युवक म्हणून याकडे तालुक्यामध्ये पाहिले जाते.
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजणार असून अनेक नेत्यांनी निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे काहींनी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे परंतु शहरापासून जवळच असलेल्या लिंबगाव जिल्हा परिषद गटासाठी बहुजन युथ पॅंथरने जोरदार तयारी सुरू केली असून गटामधील सर्वच गावांना भेटीगाठी देऊन मतदार यांच्याशी संपर्क वाढवला आहे लिंबगाव गटात बऱ्याच गावांमध्ये बुक्तरे यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात कामाला लागले असून भिमराव बुक्तरे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लिंबगाव मधून सर्वसाधारण जागेमधून बहुजन युथ पॅंथरचे जिल्हा अध्यक्ष भिमराव बुक्तरे हे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असून त्यांनी गाव भेटीवर भर देऊन मतदाराची संपर्क वाढवला आहे.

No comments:
Post a Comment