राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारणी जाहीर
नांदेड :
भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा.बाळासाहेब रावणगावकर साहेब , जेष्ठ नेते नागनाथ घिसेवाड साहेब, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजि स्वप्निल इंगळे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.
या कार्यकारणी मधे सर्व जाती धर्मातील व सर्व घटकातील युवकांना संधी देण्यात आली आहे. या कार्यकारणीमुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थामधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
या कार्यकारणी मधे हदगाव हिमायतनगर विधानसभा अध्यक्ष म्हणून अभिलाष जैस्वाल, किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष अमोल जाधव, अर्धापूर तालुका अध्यक्षपदी विलास कल्याणकर, अर्धापूर शहर अध्यक्षपदी अनिकेत आवादे, भोकर तालुका अध्यक्षपदी परसराम पाटील जाधव, भोकर शहर अध्यक्षपदी विशाल देशमुख, हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी शितलकुमार सेवणकर, हिमायतनगर शहर अध्यक्षपदी शेख माजीद शेख याकुब, हदगाव तालुका अध्यक्षपदी अंकुश शिंदे, किनवट तालुका अध्यक्षपदी चेतन मुंडे,माहुर तालुका अध्यक्षपदी संतोष कोपुलवार, यांची निवड करण्यात आली आहे.तर जिल्हा कार्यकारणीत अनेक होतकरू व सर्व समावेशक अश्या युवकांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये
वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मनोज मुखेडकर,जिल्हा उपाध्यक्षपदी सय्यद जफर,संदीप राऊत,शिवम जयस्वाल सरचिटणीस पदी महावीर आडे,गौतम भवरे,विजय कदम, पांडुरंग पावडे,कृष्णा पाटील, कैलास पाटील इंगळे,जिल्हा चिटणीसपदी रमेश पाटील जिल्हा सचिवपदी शिवराज कल्याणकर, दत्ता पारवे , राजेंद्र पावडे जिल्हा संघटकपदी चैतन्य वाघमारे व कामेश मुनेश्वर यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी नांदेड जिल्हाचे मा.खासदार तथा लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची ही पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या धडाकेबाज लोकहिताच्या निर्णयामुळे व जिल्ह्याचे लोकनेते नेते मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शेकडो युवक कार्यकर्ते जिल्ह्यात पक्षाला जोडले गेले आहेत. काल पासून मी युवक संघटना मजबुत करण्यासाठी जिल्हा दौरा सुरू केला आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन युवकाशी संवाद साधून जास्तीत जास्त युवक हे कसे संघटने मधे जोडला जातील यावर आम्ही काम करणार आहोत व अनेक युवक कार्यकर्त्यांचा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी मधे प्रवेश करणार आहोत असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांनी केले.


No comments:
Post a Comment