यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे शॉर्ट बोवेल सिंड्रोम शस्त्रक्रिया यशस्वी ;
सर्जिकल गॅस्ट्रोएंन्ट्रॉलॉजीस्ट डॉ. प्रसाद बाबू व डॉ.अमरचंद यांच्या विशेष प्रयत्नातून अंत्यत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून रुग्णास जिवनदान
नांदेड – प्रतिनिधी :
देगलूर येथील ६१ वर्षीय रुग्ण रविंद्र मसनाजीराव भुपाळे यांना अचानक पणे तिव्र पोटदुखीच्या आजाराचे तपासणी अंती लहान आतड्याला तीन-चार ठिकाणी मोठे डॅमेज झाल्याचे निदान झाले व त्यावर अतिशिघ्र स्वरूपात शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते त्यावर सलग दिड वर्षात तीन शस्त्रक्रिया करून यशोदा हॉस्पिटलचे तज्ञ सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीस्ट डॉ. प्रसाद बाबू व डॉ.अमरचंद यांनी रुग्णास जिवनदान देण्याची किमया साधली आहे याबद्दल रुग्ण श्री रविंद्र यांनी डॉ.अमरचंद यांना देवदूत म्हणत आभार मानले आहेत
यासंदर्भात सविस्तर माहीती देतांना डॉ.अमरचंद म्हणाले की, बोवेल सिंड्रोम हा एक गुंतागुंतीचा आजार आहे जो लहान आणि/किंवा मोठ्या आतड्याच्या काही भागाच्या शारीरिक नुकसानामुळे किंवा कार्याच्या नुकसानीमुळे होतो. परिणामी, शॉर्ट बोवेल सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये चरबी, कार्बोहायड्रेट्स (साखर), जीवनसत्त्वे, खनिजे, ट्रेस घटक आणि द्रव (मालअब्सॉर्प्शन) यांसारख्या पोषक तत्वांचे शोषण करण्याची क्षमता कमी असते. शॉर्ट बोवेल सिंड्रोमची विशिष्ट लक्षणे आणि तीव्रता प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलते. अतिसार सामान्य आहे, बहुतेकदा तीव्र असतो आणि निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतो, जो जीवघेणा देखील असू शकतो.
सदरील रुग्णाच्या शस्त्रक्रियेत शॉर्ट बोवेल सिंड्रोम लहान आतड्याचा अर्धा किंवा अधिक भाग शस्त्रक्रियेने काढून टाकत त्यास पुन्हा सहा महीन्यांने दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करत दोन्ही आतडी जोडली व त्यानंतर पुढच्या एक वर्षाने अजून एक शस्त्रक्रिया करून लहान आतड्याची लांबी वाढवून पुढे लहान व मोठे आतडे जोडल्यानंतर हळूहळू रुग्णाची पूर्णपणे सर्वसामान्य जिवन जगण्यास सुरूवात झाली आहे
लहान आतड्याच्या सिंड्रोमच्या उत्पत्तीमध्ये आणि/किंवा उपचारांमध्ये मोठ्या आतड्याची (कोलन) उपस्थिती किंवा अनुपस्थिती देखील महत्त्वाची भूमिका बजावते असे शेवटी डॉ.अमरचंद यांनी नमूद केले
रुग्णाने मानले यशोदा टिमचे आभार ..
यावेळी पत्रकार परिषेदेसाठी उपस्थित रुग्ण श्री रविंद्र भुपाळे जे परिवहन मंडळात वाहक पदावर कार्यरत होते त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना तिव्र पोटदुखीचा सामना करावा लागला परंतु यशोदा हॉस्पिटलचे गॅस्ट्रॉएंन्ट्रॉलॉजीस्ट डॉ. प्रसाद बाबू , डॉ.अमरचंद आणि त्यांच्या टिमच्या अतुलनिय कामगिरीमुळे आपण आज जिवंत आहोत खऱ्या अर्थाने डॉ. प्रसाद बाबू डॉ.अमरचंद हे माझ्यासाठी देवदूत ठरले आहेत तसेच जनसंपर्क अधिकारी किरण बंडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यशोदा हॉस्पिटल करीता येथे करा संपर्क
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी जनसंपर्क अधिकारी श्री किरण बंडे ९१५४१६७९९७ किंवा श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


No comments:
Post a Comment