भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने किनवट येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 26 November 2025

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने किनवट येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

 भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने किनवट येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा



नांदेड : 

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.२६नोहेंबर२०२६ रोजी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय बौद्ध महासभा  पदाधिकारी उपासक उपासिका व डॉ.आंबेडकर प्रेमी जनता , शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे तसेच महिला शाखा अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




तसेच  महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील एन.सी.सी. प्रमुख ज्ञानेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली, यावेळी सहशिक्षिका वैशाली साबळे यांच्यासह उपस्थित संविधान प्रेमी नागरिकांनी संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांनी केले.यानंतर किनवट येथील मुख्य मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र सजवलेल्या रथासह संविधान जागृती बाबत घोषणा देत बँड पथक व लेझीम पथकासह रॅली काढण्यात आली. 




कार्यक्रमात पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार उपाध्यक्ष अनिल उमरे, संघटक सेवानिवृत्त प्राचार्य राजाराम वाघमारे, गिरीश नेमानीवार,  वसंत सर्पे, कैलास पाटील, सुरेश पाटील, सैनिक राहुल घुले, मधुकर मुनेश्वर,गंगाधर कदम,एन.एस.गायकवाड, निवृत्त शिक्षक रमेश येरेकार ,गौतम दामोदर,पांडुरंग भालेराव,शिलरत्न येरेकार, सुबोध सर्पे,आनंद कावळे,सुगत भरणे यांच्या सह महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उपप्राचार्य शाम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक मनोज भोयर, पर्यवेक्षक मुकुंद मुनेश्वर व संपूर्ण शिक्षक- शिक्षीका, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, निवृत्त पर्यवेक्षक बंडु भाटशंकर,पँथर राम भरणे,प्रशांत मोरे, ॲड.सुनील येरेकार, प्रा. डॉ.आनद भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष देवरत मुनेश्वर शंकर गायकवाड,मारोती मुनेश्वर, सखाराम घुले,प्रकाश कांबळे,दिलीप मुनेश्वर यांची उपस्थिती होती.यानंतर शहरातील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर संविधान स्तंभाजवळ मानवंदनेसह अभिवादन व संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.येथील कार्यक्रम आटोपून रॅली सह राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर अशोक स्तंभ व क्रांतीवीर बिरसामुंडा यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी एन. सी. सी. पथकाने ड्रील मार्च करून रायफलद्वारे डॉ बाबासाहेब पुतळा, संविधान स्तंभ व अशोक स्तंभ येथे मानवंदना दिली.




गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालय किनवट येथे रॅलिचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages