भडकलगेट येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
रक्तदानातून अभिवादन करण्याचा संकल्प
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजन
संभाजीनगर :
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त शनीवार दि.६ डिसेंबर रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेयर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या च्या सहकार्यातून रक्तदान करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा संकल्प केला असून उपक्रमाचे हे १० वे वर्ष असल्याची माहिती आयोजक सचिन निकम यांनी दिली आहे.
भडकलगेट येथील संविधान प्रास्ताविकेच्या समोर सकाळी १० ते ०५ यावेळेत हे शिबिर होणार असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी शासकीय रक्तपेढी अहमदनगर व शासकीय रुग्णालय, छ. संभाजीनगर यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात येणार आहे. रक्तदात्याना रक्तगट तपासणी, मोफत रक्तपिशवी व सवलतीचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. रक्तदानामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचल्याने वैद्यकीय उपचारांना मदत होऊ शकते. ते गरजूंना जीवनरेखा प्रदान करते त्यामुळे १८ते ६५ वयोगटातील किमान 50 किलो वजन असलेल्या स्त्री-पुरुष रक्तदान केलेच पाहिजे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या माध्यमातून अस्पृश्यता नाकारण्याचा मोठा संदेश जात असल्याने आंबेडकरी अनुयायांनी रक्तदानातून अभिवादन करावे असे आवाहन कुणाल भालेराव, प्रा.प्रबोधन बनसोडे, राष्ट्रपाल गवई, बालाजी सोनवणे, प्रा.सागर गायकवाड, हेमंत मोरे आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment