नांदेड :
महाराष्ट्रात दर दिवशी साधारणपणे ४५०० ते ५००० गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते .सदर बाबा विचारात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य शहरात विक्कीभाऊ वाघमारे युवा मंच आणि सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ,फायर स्टेशन जवळ ६ डिसेंबर सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी , नेत्र तपासणी तसेच भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . यंदाचे हे सहावे वर्ष आहे , तसेच सायंकाळी ७ वाजता पणतीज्योत रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नये,गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे असे आवाहन विक्कीभाऊ वाघमारे युवा मंच चे छकुल कांबळे, आकाश खरात ,साई पाटील , सोनू इंगोले, पिराजी गायकवाड, अविनाश शेंडे , अभी कोल्हे , अनिकेत कांबळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment