मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 13 January 2026

मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...

 मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...




मुंबई :- गेल्या महिन्याभरापासून राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडाल्याचे दिसून आले. त्यात आचारसंहितेनुसार मतदानाच्या काही तास आधी प्रचार थंडावतो. त्यानुसार आज महापालिका निवडणुकाचा प्रचार संपणार आहे. प्रचार सभा, रॅली सगळे काही बंद होणार आहे. मात्र त्यातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

     प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे . फक्त पक्षाची पत्रके वाटण्यास परवानगी नाही. २ दिवसांपूर्वी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यात सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी जे उमेदवार आहेत त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना त्यांचा प्रचार १३ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येईल. परंतु १३ ते १५ जानेवारी अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांना त्यांचा प्रचार घरोघरी जाऊन करता येईल. फक्त राजकीय पक्षांना पत्रके वाटून प्रचार करता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या आहेत.

     मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांकडून मतदानाच्या दिवसापर्यंत काही नियमांचे उल्लंघन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेस असेल आणि अन्य लोकांनी यावर आक्षेप घेतला. याआधी अशा प्रकारे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आता तुम्ही असा निर्णय का घेत आहेत असे  विरोधकांनी विचारले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय कायम ठेवला आहे. राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय भविष्यात वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. 


'बिनविरोध'निवडीवर हायकोर्टात सुनावणी


दरम्यान, राज्यात मतदानापूर्वीच ६० हून अधिक ठिकाणी महायुतीचे बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी ज्याठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर उद्या १४ जानेवारीला तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून ज्याठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यात तिथे स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम ठेवावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल.

No comments:

Post a Comment

Pages