हिंदी भाषेची जबरदस्ती आमच्यावर होऊ नये, तर भाजप सत्तेत आला तर, मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे करेल
उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप
मुंबई :
राज्यात हिंदी भाषेची जबरदस्ती आमच्यावर होऊ नये, तर भाजप सत्तेत आला तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे करे असा उद्धव ठाकरे शिवसेनेने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. राज्यात मुंबईमध्ये हिंदी भाषेची जबरदस्ती आमच्यावर होऊ नये. घाटकोपरमध्ये गुजराती भाषा बोलण्याचा निर्णय ते घेतील आणि आम्ही ऐकावे? 1960 मध्ये गुजरातची मुंबईवर नजर होती, ती आजही कायम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप सत्तेत आला तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे करेल, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.
आम्ही कोस्टल रोड टोलमुक्त केला, पण उद्घाटनाचे श्रेय त्यांना मिळाले. आता भ्रष्टाचाराचे प्रदूषण सर्वत्र दिसते, धूळ आणि सिमेंटचे साम्राज्य पसरले आहे. 4 वर्षांत 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याचा बाप उधार घ्यावा लागतो. तुमच्या पूर्वजांचे नाव घेऊन मते मागा. मेट्रोची कामे काँग्रेसच्या काळात सुरू झाली. कोस्टल रोड, पाणीपुरवठा आणि धरणांची कामे आम्ही विक्रमी वेगाने पूर्ण केली. हे सर्व मुंबईच्या विकासासाठी होते, पण आता भ्रष्टाचाराने सर्व नष्ट होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मराठी लोकांमधील भांडणाचा फायदा अब्दालीसारखे लोक घेतात. यांना आई-बापाचा ठावठिकाणाही माहीत नाही. ते मारामारी लावतात आणि सत्ता उपभोगतात. खरे शत्रू ते आहेत, पण माझी माणसे फोडून माझ्यावर दोष देतात. रक्तदानासाठी भाजपावाले येत नाहीत, पण मात्र गोमूत्र शिंपडायला येतात. मुंबईवर दोन श्रीमंतांचा डोळा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठींवर गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई गुजराती होता. त्याने गोळ्या वाया घालवू नका असे सांगितले. हा माणूस गुजरातचा होता. 1960 पासून मुंबईवर त्यांचा डोळा आहे. ते महाराष्ट्रातून मराठी संस्कृती संपवू इच्छितात, आणि मराठी लोकांना बाहेर काढू इच्छितात,असे ठाकरे म्हणाले.
राज्यातील भाजपा सरकारचा ही मुंबईवर डोळा आहे. धारावीच्या माध्यमातून अर्धी मुंबई अदानींना दिली. आम्ही मोर्चे काढू, आंदोलने करू, पण अनेक कामे आदेशाने दिली जातात. आता पुन्हा मुंबईचे नाव बॉम्बे करतील. त्यांचा नेता आयआयटीमध्ये सांगून गेला. मुंबईत मराठी माणूस हळूहळू बाहेर पडत चालला आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एअर इंडिया, एमटीएनएल सारख्या संस्थांमध्ये शिवसेनेने मराठींना नोकऱ्या दिल्या. मराठींवर अन्याय झाल्यास मनसे आणि आम्ही आंदोलने करतो, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहे.
मुंबईवर अनेक संस्था राज्य करतात. धारावीमध्ये वर्षानुवर्षे लोक राहतात, पण ते त्यांना बाहेर काढणार आणि बाहेरच्यांना आत आणणार. शिवसेना मराठी ओळख जपण्यासाठी लढते. आम्ही पिढ्यानपिढ्या असलेल्या सर्वांना साथ देतो, पण बाहेरून येऊन दादागिरी करणाऱ्यांना विरोध करतो. मराठी संस्कृती आणि मुंबईचे रक्षण ही आमची प्राथमिकता असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

No comments:
Post a Comment