किनवट नगर परिषद: सुजाता येंड्रलवारांच्या निर्णायक मताने मोहम्मद हसन उपाध्यक्षपदी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 14 January 2026

किनवट नगर परिषद: सुजाता येंड्रलवारांच्या निर्णायक मताने मोहम्मद हसन उपाध्यक्षपदी

 किनवट नगर परिषद: सुजाता येंड्रलवारांच्या निर्णायक मताने मोहम्मद हसन उपाध्यक्षपदी 




किनवट :  नगर परिषदेच्या आज (दि. १४) झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त राजकीय चुरस अनुभवायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मोहम्मद हसन म. नूर खान पठाण यांनी भाजपचे श्रीनिवास नेम्मानीवार यांचा निर्णायक मताने पराभव करत उपाध्यक्षपद मिळवले.निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान ११-११ मते मिळाल्याने सभागृहात तणावाचे वातावरण पसरले. अखेर नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी सुजाता येंड्रलवार यांनी आपले निर्णायक  मत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या बाजूने टाकून मोहम्मद हसन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

    दरम्यान, दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या दोन अर्जांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे साजिद खान यांची निवड झाली. दुसऱ्या पदासाठी उमेदवार प्रशांत कोरडे यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने तो रद्द झाला, असे प्रशासनाने स्पष्ट केले.ही निवडणूक नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान सुजाता येंड्रलवार यांनी सांभाळले, तर मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी सचिवपदी काम पाहिले.किनवट नगर परिषद – पक्षीय ताकदबलनगराध्यक्षा: शिवसेना (ठाकरे)राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): ०५राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): ०५भाजप: ०४शिवसेना (ठाकरे): ०३शिवसेना (शिंदे): ०१अपक्ष: ०३

एकूण नगरसेवक: २११४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सभागृहात झालेल्या या निवडणुकीमुळे किनवटच्या राजकारणात नवीन समीकरणे घडत असल्याचे उघड झाले. या विजयाने आगामी निर्णयप्रक्रिया अधिक रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे.सभेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे, करण येंड्रलवार, राष्ट्रवादी (शरद पवार) नेत्या बेबीताई प्रदीप नाईक, अनिल क-हाळे, युवा सेनेचे तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी सशक्त पोलिस बंदोबस्त ठेवला.

No comments:

Post a Comment

Pages