स्वप्नपूर्तीचा क्षण : प्रदीप नाईकच्या निष्ठावंत मावळ्याला उपाध्यक्षपदाचा सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 14 January 2026

स्वप्नपूर्तीचा क्षण : प्रदीप नाईकच्या निष्ठावंत मावळ्याला उपाध्यक्षपदाचा सन्मान

 स्वप्नपूर्तीचा क्षण : प्रदीप नाईकच्या निष्ठावंत मावळ्याला उपाध्यक्षपदाचा सन्मान




किनवट, दि.१४: राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसून, निष्ठा, संयम आणि संघर्षाची कसोटी असते, याचा प्रत्यय किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निवडीतून पुन्हा एकदा आला आहे. प्रदीप नाईकांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते हसन लाला यांना अखेर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा भावनिक समाधानात बदलली.

    किनवट नगरपरिषद निवडणुकीत सलग दोन वेळा कठीण लढतीला सामोरे जाणारे हसन लाला हे प्रदिप नाईक यांच्या विचारांचे प्रामाणिक वाहक होते. “हसन लाला नगरसेवक व्हावेत” ही नाईक यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि स्वतः नाईकांनी केलेले प्रयत्न त्या वेळी फळाला आले नाहीत. मात्र, नियतीने वेगळेच पान उघडले.

गतवर्षी नाईकांचे दुःखद निधन झाले असले, तरी अवघ्या एका वर्षात त्यांच्या स्वप्नाला आकार मिळाला. हसन लाला नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याहूनही अधिक गौरवास्पद म्हणजे, आदरणीय बेबी ताई नाईक आणि युवा नेते कपिल नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांची समजूत काढत उपाध्यक्षपदासाठी हसन लाला यांचे नाव एकमताने सुचविण्यात आले.

    हा निर्णय केवळ एका पदापुरता मर्यादित नाही. तो मुस्लिम समाजाला दिलेला सन्मान आहे, तसेच प्रदीप नाईक यांच्या निष्ठावंत सैनिकाला मिळालेला खरा न्याय आहे. संघर्षाला मिळालेली पावती आणि निष्ठेला मिळालेला मान,यामुळे किनवटच्या राजकीय इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.

  या ऐतिहासिक निर्णयासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबाबा दादा खराटे, नगराध्यक्ष सुजाता येंड्रलवार, करण येंड्रलवार, प्रशांत कोरडे सह सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किनवट व माहूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. निष्ठा कधीच वाया जात नाही,आज हसन लाला यांच्या रूपाने त्याची प्रचिती किनवटने अनुभवली आहे.

No comments:

Post a Comment

Pages