नव्या विचाराने प्रेरीत युवा नेतृत्व - करण ऐन्ड्रलवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 26 February 2026

नव्या विचाराने प्रेरीत युवा नेतृत्व - करण ऐन्ड्रलवार

 नव्या विचाराने प्रेरीत युवा नेतृत्व-  करण ऐन्ड्रलवार 



करण हा आधुनिक कर्ण आहे ज्याचे कवच व कुंडल हजारो तरुणांच्या प्रेमातून व गरीबाच्या आशीर्वादातून त्याला प्राप्त झाले.


वारसाने संपत्ती प्राप्त होते. परंतु, नेतृत्व करण्याची धमक स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण करावी लागते. करणच्या एका आवाजात तालुक्यातील हजारो तरुण त्यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. असे प्रेम आणि ताकद तालुक्यातील कुठल्याही नेत्यांच्या पुत्राने अथवा जे स्वंयघोषित युवा नेते म्हणून तालुक्यात मिरवतात त्यांना निर्माण करता आली नाही.


विद्यार्थी सचिव:

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावे, येणाऱ्या पिढीत कुशल नेतृत्व उभे रहावे म्हणून कॉलेजमध्ये विद्यार्थी सचिव निवडला जातो. किनवट येथील कॉलेजचे चतुर प्राध्यापक असा विद्यार्थी निवडून आणत जो त्यांच्या हातातील बाहूला असेल, असा पोपट जिथे म्हणेल तिथे सही करुन मोकळा होईल. 


विद्यार्थ्यांचे खंबीर नेतृत्व करणारा नेता :

तेव्हा करणने पुढाकार घेऊन विद्यार्थी निवडणुकीत प्राध्यापकांचा हस्तक्षेप संपवला आणि स्वकर्तृत्वाने कॉलेजचा विद्यार्थी सचिव म्हणून निवडून आला. तालुक्यातील इतर कॉलेजमध्ये पण त्यांने नेतृत्व निर्माण करुन सचिव निवडून आणले. करणने निवडून आणलेल्या दोन विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. निवडून आणलेले दोन विध्यार्थी विद्यापीठ स्तरावर चमकले त्यामुळे तो विद्यार्थ्यांचे खंबीर करणारा नेता म्हणून पुढे आला. 


भरमसाठ फी विरोधात इंग्रजी शाळेवर मोर्चा- 

करणने दरी- खोऱ्यातून, वाडी- तांड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  हॉस्टेल, स्कॉलरशिप, परीक्षा, निवास अशा विविध समस्या निरपेक्ष भावनेने सोडवल्या. तालुक्यातील  इंग्रजी शाळेत पालकांकडून वसूल होणाऱ्या भरमसाठ फी वर अंकुश बसावा म्हणून पाच- सहाशे विद्यार्थी व पालकासोबत इंग्रजी शाळेवर मोर्चा काढला. तसेच शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदने दिली. अशा समाज हिताच्या कार्यामुळे करणला विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.


निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज 

 

काही वर्ष करण मुबईला असून सुद्धा त्याने तालुक्यातील कार्यकर्त्याची फौज वाढवली. तो हिरहीरीने कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होत. करणने मोठ्या अंतकरणाने गरीब लोकांना वैदयकीय मदत दिली महापुरुषाची जयंती असो अथवा धार्मिक कार्य त्याने सर्वांना तन, मन, धनाने मदत केली. करणच्या दानशूर व्यक्तिमत्वा मुळे त्याच्यामागे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज उभी राहीली.


माजी आमदार स्व. प्रदीप नाईक साहेब निष्ठावंत कार्यकर्ता

समाज कार्यातून राजकारण करण्याची तळमळ असल्यामुळे  करणने युती धर्मानुसार विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय प्रदीप नाईक साहेब यांचा प्रचार संपूर्ण ताकतीने केला. त्यांचा परिणाम स्वरूप प्रदीप नाईक यांना किनवट शहरांत मागील पंचवीस- तीस वर्षाच्या तुलनेत ऐतिहासिक लीड मिळाली परंतु दुर्देवाने नाईक साहेब निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. प्रदीप नाईक साहेबांच्या अकाली निधना नंतर त्यांच्या जवळचे कार्यकरत्यांनी दलबदल करुन सत्तेच्या पायाशी जाऊन बसले परंतु करणने सत्तेसाठी निष्ठा सोडली नाही. करणने नाईक कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले.




पूरग्रस्तांना मदत: 

मागे किनवट तालुक्यात अतिवृष्टी झाली. पैनगंगा व नाल्याच्या शेजारी असणारी  एक हजारच्या वर घरात पुराचे पाणी घुसले. त्यामुळे एक हजार कुटूंबाचे जीवन आवश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल तर कुणाचे घर मोडून पडले. काही नेत्यांनी पूरग्रस्त लोकांच्या भेट घेऊन शासनाची मदत मिळवून देऊ अशी पोकळ आश्वासने देऊन निघून गेली परंतु करणने गरीब कुटुंबाला तातडीने मदत देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक हजार पुरग्रस्त कुटुंबाना राशनची किट दिली. त्यामुळे पूरग्रस्त कुटूंबाला परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळाले.


जाती धर्माच्यापुढे जाऊन माणूस ओळखणारा युवा नेता :


प्रश्न हा नाही की नेते किती आहेत, प्रश्न हा आहे की तळागळापर्यंत पोहचून काम कोण करू शकतो. जाती धर्माच्या वर जाऊन माणूस म्हणून लोकांच्या सुख- दुःखात कोण सहभागी होऊ शकतो. कार्यकर्त्यांना चटई उचलण्यापर्यन्त मर्यादित न ठेवता त्यांना रोजगार देऊन त्याचे आयुष्य कोण सुखमय करू शकतो. 


करण नव्या विचाराने प्रेरीत एक युवा नेतृत्व आहे. येणाऱ्या काळात किनवट तालुक्यातील राजकारणात त्याचे मोठे वलयं असेल, याबद्दल तीळमात्र शंका नाही.

No comments:

Post a Comment

Pages