विद्यापीठाच्या किनवट उपकेंद्रात एम.एस. डब्ल्यू. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 26 March 2026

विद्यापीठाच्या किनवट उपकेंद्रात एम.एस. डब्ल्यू. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

विद्यापीठाच्या किनवट उपकेंद्रात एम.एस.डब्ल्यू. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न



​किनवट : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे उपकेंद्र  कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे एम.एस.डब्ल्यू. (२०२४-२५) बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) डॉ. हणमंत कंधारकर लाभले होते. एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.

​याप्रसंगी बोलताना डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजकार्य ही केवळ पदवी नसून ती वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे."

​अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "किनवटसारख्या दुर्गम भागात राहून विद्यार्थ्यांनी केलेले क्षेत्रीय कार्य (Field Work) कौतुकास्पद आहे. या केंद्रातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचा एक संवेदनशील आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रमोद राठोड,प्रा. प्रिती देवस्थले, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीराम पवार, प्रा. श्रीकांत दुधारे,विठ्ठल हंबर्डे, रमेश जकुलवार, रामभाऊ टेकाम, वर्षाताई, सुरक्षा रक्षक राजीव जाधव, सुनील टेकाम, मुरली पवार आणि केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

​यावेळी एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रातील अनुभव आणि प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. या सोहळ्याला विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages