महात्मा जोतीबा फुले विद्यालयात संविधान दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 November 2019

महात्मा जोतीबा फुले विद्यालयात संविधान दिन साजरा

महात्मा जोतीबा फुले विद्यालयात संविधान दिन साजरा

गोकुंदा (किनवट) :       
      महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात अाला. प्रारंभी प्राचार्य अार. जी. वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पर्यवेक्षक शेख हैदर यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले यावेळी प्राचार्या स्वाती डवरे,उप प्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकुर, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी भालेराव यांची उपस्थिती होती .
      यानंतर सांस्कृतिक प्रमुख बंडू भाटशंकर यांनी घोषवाक्याच्या माध्यमातून संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. त्यानंतर गोकुंदा येथील मुख्य रस्त्याने संविधान प्रास्ताविका घेऊन ढोलताशासह विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली रॅलीत प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक, प्राध्यापक, व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages