पहापळ येथे संविधान साक्षरग्राम उपक्रमाची सुरवात.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 November 2019

पहापळ येथे संविधान साक्षरग्राम उपक्रमाची सुरवात..

पहापळ येथे संविधान साक्षरग्राम उपक्रमाची सुरवात..
एक महीना कार्यक्रमाची रेलचेल !

यवतमाळ ( प्रतिनिधी ) :
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त केळापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पहापळ व त्रीरत्न बुद्ध विहार पहापळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे च्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून  संविधान दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत असतो, त्याच अनुषंगाने याही वर्षी संविधान दिनानिमित्त "संविधान साक्षर ग्राम " हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आयोजन करण्यात आले.
        त्या अंतर्गत आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील पहापळ ता. केळापूर निवड करण्यात आली असल्यामुळे आज दिनांक २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त  "संविधान साक्षर ग्राम" कार्यक्रमाचे सुभारंग केळापूर तालुक्यातील गट विकास अधिकारी मा. पी.एन.वानखेडे सर  यांच्या हस्ते करण्यात आले. 
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दोंलत आडे , उपाध्यक्ष  म्हणून ग्राम संघ अध्यक्ष शोभा करपते  हे होते. तर प्रमुख उपस्थिती प्रा.डाँ.उत्तम शेंडे. मा.मु.शा. वसतिगृह गृहपाल रत्ने सर ,पोलीस पाटील संगीता खंडारे, मुखध्यापक श्रीकांत वटाने सर, मुखध्यापक के.एस.भाटशंकर,  मुखध्यापक विजय चव्हाण, मुख्याध्यापक  कविता तगडपेलल्लीवार , ग्राम पंचायत  सचिव पी. एस.माने सर, कृषी सहायक श्री पवार , युवक प्रमुख तसेच मुख्यमंत्री ग्रामदूत सूरज चोधरी, बार्टीचे राळेगाव तालुका समतादूत श्रीकांत रोहनकर, यवतमाळ तालुका समतादूत मनीषा खंडारे उपस्थित होते.. तर कार्यक्रम सूत्रसंचालन व संविधानावर व्याख्यान प्रा.डाँ. उत्तम शेंडे सर,घांटजी ह.मु.पहापळ.यांनी दिली. तसेच मार्गदर्शन वणी तालुका समतादूत किशोर संकवार यांनी केले तर कार्यक्रम प्रस्तावना कळंब तालुक्य समतादूत रुपेश वानखेडे यांनी केले.. 
       बार्टीचे महासंचालक कैलास कणसे सर, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मॅडम, अमरावती सहायक प्रकल्प संचालक राहुल कराळे सरांच्या नेतृत्वाखाली   संपूर्ण संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाचे  नियोजन तालुका समतादूत किरण जाधवसर, व समतादूत प्रकाश गाढवे सरांनी केलें तसेच त्रीरत्न बुद्ध विहार समीती यांनी  मदत केली. संविधान साक्षर ग्राम उद्धगाटन कार्यक्रम उद्देशिका वाचन, प्रभात फेरी गावभर तसेच डाँ.बाबासाहेबांना अभिवादन कार्यक्रम आयोजीत करन्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages