उत्तम कानिंदे यांचा न्यायमुर्तीचा हस्ते गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 November 2019

उत्तम कानिंदे यांचा न्यायमुर्तीचा हस्ते गौरव

उपक्रमांच्या उत्कृष्ट संयोजनासाठी उत्तम कानिंदे यांचा न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केला गौरव

किनवट ( प्रतिनिधी ) :
 " न्याय आपल्या दारी पंधरवाड्या " निमित्त विविध उपक्रम यशस्वी केल्याबद्दल शुक्रवारी ( दि. २२ ) रोजी पंचायत समिती, सभागृहात संयोजक उत्तम कानिंदे यांना 'अभिनंदन पत्र ' बहाल करून  दिवाणी न्यायाधीश मा. जहांगीर र.पठाण यांनी गौरव केला.
              महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अधिनस्त तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दि. नऊ ते २४ नोव्हेबर या कालावधीत " न्याय आपल्या दारी पंधरवाडा " साजरा करण्यात आला. यानिमित्त बालक दिन, विधी साक्षरता महाफेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व विधी ( कायदा ) साक्षरता शिबीर आदि उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व शाळा -महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांनी हे उपक्रम यशस्वीपणे राबविले. " सर्वांसाठी न्याय " ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेल्या धडपडीबद्दल उत्तम कानिंदे यांना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर ) जहांगीर र.पठाण यांनी 'अभिनंदन पत्र ' बहाल करुन गौरविले.
              यावेळी सहदिवाणी न्यायाधीश मा.जे.एन. जाधव, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, सहसचिव अॅड. राहूल सोनकांबळे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, विधी सेवा समिती सदस्य निवृत्त प्राचार्य वि. मा. शिंदे, के. मूर्ती, पोलिस निरीक्षक मारोती थोरात व विधी सेवा समिती सचिव तथा गट विकास अधिकारी सुभाष धनवे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
              त्यांच्या गौरवाबद्दल मुंबई हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बलदेवसिंह चौहान, निवृत्त गट शिक्षणाधिकारी अरूणकुमार वतनीवकील, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, सुदर्शन मेश्राम, संजय कराड, सूर्यकांत बाच्छे, ना.ना. पांचाळ, केंद्र प्रमुख रमेश राठोड, इब्टा केंद्रिय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश चौधरी व रमेश मुनेश्वर, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, जीवन गुरनुले आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages