सशक्त विद्यार्थी अभियानांतर्गत जि.प. अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला मुलांना लोहयुक्त गोळ्या -औषधांचा डोस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 November 2019

सशक्त विद्यार्थी अभियानांतर्गत जि.प. अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला मुलांना लोहयुक्त गोळ्या -औषधांचा डोस

सशक्त विद्यार्थी अभियानांतर्गत जि.प. अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला मुलांना लोहयुक्त गोळ्या -औषधांचा डोस

नांदेड (प्रतिनिधी ) :
           जि.प.हायस्कूल जवळगांव ता.हिमायतनगर येथे जिल्हा अारोग्य विभाग व जिल्हा परिषद नांदेड तर्फे सशक्‍त विद्यार्थी अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांतील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्याच्या उद्देशाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना IFA गोळ्या वाटपाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला.
            सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृती पवार होत्या.  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे , शिक्षण व अारोग्य सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापती राठोड ताई ,जवळगावच्या सरपंच सुनिता धरमुरे , उपसरपंच  रंजना पवार , जिल्हा अारोग्य अधिकारी डाॅ.बालाजी शिंदे , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी (नि.शि. ) दिलीप बनसोडे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
          याप्रसंगी पंचायत समिती हिमायतनगरचे गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, बालविकास प्रकल्प अधिकारी मांजरमकर, गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड,तालुका अारोग्य अधिकारी डॉ.पोहरे, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीरंग पवार, उपाध्यक्ष साईनाथ कसेवाड, नागोराव पवार, ग्रामसेवक वडजकर  यांची प्रमुख उपस्थीती होती.
      संतोष रायेवार व सारीका यरमवार यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापक बी.एस.गोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक झांबरे, माळगे, चेपुरवार,कदम, गोवंदे, श्रीमती ढोकाडे ,श्रीमती गुरफळे, श्रीमती कमळू,श्रीमती मुस्कावाड,पवार,डी.एम.धाडे,श्रीमती राठोड यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages