आंबेडकरवादी कविंची काव्यमैफिल २९ रोजी नांदेडात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 December 2019

आंबेडकरवादी कविंची काव्यमैफिल २९ रोजी नांदेडात


सोशल मीडियावर अभिव्यक्त होणार्‍या कवींची आंबेडकरवादी काव्यमैफिल २९ रोजी नांदेडात

नांदेड : आजचे तरुण कवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. राज्यभरातील आंबेडकरवादी कवींची निवड करुन येत्या २९ डिसेंबर रोजी प्रत्यक्षात काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी आदिलबाद येथील ज्येष्ठ कवी मधू बावलकर हे राहणार असून अतिथी कवी म्हणून लोकनाथ यशवंत (नागपूर), प्रशांत वंजारे (यवतमाळ), डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे (बुलढाणा), शेषराव धांडे (वाशिम), अनुरत्न वाघमारे (नांदेड) यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संयोजक गंगाधर ढवळे यांनी दिली. 
      शहरातील शुभारंभ मंगल कार्यालयात रविवारी रात्री ७.०० वा. काव्यमैफिलीस सुरुवात होणार आहे. त्यात सोशल मीडियावर अभिव्यक्त होणारे अनेक कवी राज्यभरातून सहभागी होणार आहेत. प्रत्यक्षात कधीही भेट न झालेली ही कवीमंडळी शहरात आंबेडकरवादी विचारांचा जागर घालणार आहेत. त्यामध्ये निमंत्रित कवी म्हणून संजय घाडगे, प्रा. वंदना मघाडे, महेंद्र नरवाडे, डी. डी. कांबळे, नागेश वाहुरवाघ, विशाल डाके, सज्जन बरडे, सुजाता पोपुलवार, किरण पतंगे, गजानन दामोदर, रमेश मुनेश्वर, यशवंत क्षीरसागर, संजय ओरके, संजय गोडघाटे, शलिक जिल्हेकर, कपिल मुळे, मुन्नाभाई नंदगवळी, विजय गुंडेकर, पुजा ढवळे, बाबुराव पाईकराव, ज्योती गायकवाड , आनंद चिंचोले, राजन तारु, प्रशांत ढोले, शीतलकुमार वानखेडे, कपिल दगडे, विश्वजीत कांबळे, अनिल कांबळे, जनार्दन मोहिते, संजय मोखडे, कपिल खाडे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी कवी सहभागी होणार आहेत.

            सदरील कविसंमेलन हे स्थानिक कवी कवयित्रींसाठी खुले असून सर्वांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. उत्तम सावंत, संयोजन समितीचे अध्यक्ष धम्मानंद कांबळे भोसीकर, सत्यशोधक विचारमंचाचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे, कार्याध्यक्ष अॅड. जयप्रकाश गायकवाड, इंजि. भीमराव हटकर, राज गोडबोले, नागोराव डोंगरे,डॉ. राजेश पंडित, डॉ. राम वनंजे, रमेश कसबे, राहुल गवारे, एन. टी. पंडित, एन. डी. गवळे, संभाजी झडते, प्रभू ढवळे,  दिपक साळवे, अनिता गोडबोले, जयश्री डोंगरे, संजय जाधव, एम. डी. जोंधळे, ज्ञानोबा दुधमल सदानंद सपकाळे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, पांडुरंग कोकुलवार आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages