साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापनदिनी किनवट येथे डायलेसिस युनिट चे उदघाटन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 December 2019

साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापनदिनी किनवट येथे डायलेसिस युनिट चे उदघाटन


साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिनी किनवट येथे डायलेसिस युनिटचे उदघाटन 

किनवट : साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या 24 व्या वर्धापन दिनी (दि25) बुधवार रोजी डायलेसिस युनिटचे उदघाटन डॉ. विजय मेदपवाड यांच्या हस्ते झाले.

         साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाचा 24 व्या वर्धापन दीनानिमित्य संपन्न झालेल्या तीन दिवसीय सोहळ्या दरम्यान (दि 25) रोजी साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे डायलेसिस युनिट चे उदघाटन करण्यात आले. नाम फाउंडेशन तर्फे डायलेसिस मशिन आणि नपाते  फाउंडेशन तर्फे मिळालेल्या आर्थिक मदतीने हे  युनिट उभे करण्यात आले असून नांदेड च्या डॉ. विजय मैदपवाड यांनी तांत्रिक सहकार्य केले तसेच अनेक मदतीचे हात या युनिटच्या उभारणीसाठी पुढे आले असे साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे  यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी डॉ. मैदपवाड यांनी उपस्थितांना डायलेसिस या विषयावर मार्गदर्शन केले.

       व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान हे  होते तर डॉक्टर्स असोसिएशन चे प्रतिनिधी डॉ संजय लोमटे यांची प्रमुख उपस्तिथी होती. कार्यक्रमात प्रा. किशनराव   किनवटकर  ,प्रा. रामप्रसाद तौर , डॉ. राहुल तौर योगशिक्षक अखिलखान , गंगन्ना नेम्मानिवार, मुरलीधर बेलखोडे, डॉ. शोभा बेलखोडे ,रिद्धीश्वर बेलखोडे वे बेलखोडे  परिवाराचे इतर सदस्य ,डॉ. तेलंग , डॉ. उस्मान ,डॉ. विजय काळे , डॉ. संदीप जन्नवार, डॉ. सुरेंद्र जन्नवार, डॉ. प्रसाद सुर्वे ,डॉ. पूनम तौर ,डायलेसिस युनिटचे तंत्रज्ञ मोरसिंग चव्हाण ,किनवट शहरातील प्रतिष्ठीत आणि डॉक्टर्स मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Pages