विजपुरवठा सुरळीत करा -आमदार केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 December 2019

विजपुरवठा सुरळीत करा -आमदार केराम

रोहित्र दुरुस्ती केंद्र कार्यान्वित करावे -आमदार भिमराव केराम

किनवट : तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी व नागरिक सातत्याने रोहित्र जळून वीजपुरवठा बंद होत असल्याने त्रस्त झाले आहेत. त्यावरील उपाययोजना म्हणून किनवट तालुक्यात रोहित्र दुरुस्ती केंद्र कार्यान्वित करावे, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी एका निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंत्याकडे नुकतीच केली आहे.

       किनवट तालुक्याचा दौरा करीत असतांना आ.केरामांना अनेक गावातील शेतकरी व नागरिकांनी वीजे अभावी होणार्‍या गैरसोयीची कल्पना दिली. सतत जळून जाणार्‍या रोहित्राविषयी माहिती दिली. अधिक चौकशीत बिघडलेले अथवा जळालेले रोहित्र दुरुस्तीची सोय भोकर येथे असून, तेथे रोहित्र पाठविल्यानंतर बराच काळ प्रतिक्षा करावी लागत असल्याने, त्याची झळ किनवट तालुक्यातील नागरिकांना व रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे. त्यामुळे या डोंगराळ, आदिवासी व मागास तालुक्यातील जनतेला त्रास होऊ नये म्हणून, किनवट तालुक्यात अखंड व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी या भागात लवकरात लवकर एक रोहित्र दुरुस्ती केंद्र कार्यान्वित करावे, अशी लेखी मागणी आ. केरामांनी अधीक्षक अभियंत्याकडे केली आहे. तसेच त्याची प्रत कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages