अस्वलाचा प्राणघातक हल्ला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 December 2019

अस्वलाचा प्राणघातक हल्ला

किनवटच्या जंगलात अस्वलाचा मुक्तसंचार ; अनेकावर प्राणघातक हल्ला

किनवट ( नांदेड ): किनवट शहरापासून जवळच असलेल्या आमडी (ता.किनवट) येथील आपल्या शेतात हरबरा पेरणीसाठी भुजंग मंतु पेंदोर (वय५५)  हा शेतात गेला असता, वन्यप्राणी अस्वलाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारार्थ त्यास गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल. ही घटना आज रविवारी (दि.८) सकाळी ७:२० वाजेच्या सुमारास घडली आहे.

      किनवट तालुक्यातील जंगलामध्ये अस्वलांची संख्या बरीच वाढली असून, गत दोन वर्षात मनुष्यावर अस्वल हल्ल्याच्या सुमारे १५ ते २० घटना घडल्या आहेत. त्यात एका व्यक्तींचा मृत्यूही झालेला असून, बर्‍याचजणांचे अवयव कायमचे निकामी झाले आहेत. याच आठवड्यात गुरूवारी आमडीजवळील चिखली येथे शेख जावेद या शेतकर्‍यावर अस्वलाने हल्ला करून, त्याचा एक डोळा फोडला तर दुसरा गंभीर जखमी केला होता. आज परत अस्वलाने तोंड व डोळ्यावर हल्ला केला. आजच्या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, आपल्या शेतात हरबरा पेरणीच्या तयारीसाठी भुजंग पेंदोर व त्यांचा मुलगा बैलगाडी घेऊन सकाळी ६:३० वाजता शेताकडे जात होते. मुलगा बैलगाडी चालवीत होता तर बाप भुंजग गाडीच्या पाठीमागे पायी चालत होते. अचानक झाडीत दबा धरून बसलेल्या अस्वलाने भुजंगावर हल्ला केला. यात भुजंग पेंदोराचा उजवा डोळा व उजवा पाय गंभीररित्या जखमी झालेला आहे. मुलाच्या आरडाओरड्याने आजूबाजूची माणसे धावत आल्याने, अस्वल जंगलाकडे पळाले. भुजंग यास गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ आणल्यानंतर, डॉ.यु.पी.धुमाळे व डॉ.साबळे यांनी जखमीस तपासून त्याच्यावर उपचार केले. मात्र, अधिक उपचारार्थ त्यास तेलंगणातील आदिलाबाद येथे पाठविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages