महापरिनिर्वाण दिनी कमठाला शाळेत बालसभा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 December 2019

महापरिनिर्वाण दिनी कमठाला शाळेत बालसभा

केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभा संपन्न

किनवट :
        केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे घटनेचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे मुख्याध्यापक शरद कुरूंदकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पदविधर शिक्षक अंकुश राऊत तसेच मातापालकसंघ अध्यक्षा बेबीताई बडेवाड  हया होत्या.
        मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ... अभिवादन करण्यात आले. सुरूवातीला  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज  यांच्यावरील पोवाड्याने झाली, इयत्ता सातवीतील श्रीकांत गेडाम, कु.शुभांगी तवरकर, कु. शुभांगी बडेवाड या  विद्यार्थ्यांनी हा पोवाडा सादर केला. पोवाड्याच्या वेशभूषेसह उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल उपस्थितांनी रोख रकमेची बक्षिसे दिले.
        बालसभेचे प्रास्ताविक कु. शुभांगी बडेवाड या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.त्रिशा गेडाम व प्रमुख पाहुणे म्हणून पायल पिलवंड या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. बालसभेचे सूत्रसंचालन कु.शुभांगी बडेवाड, श्रीकांत गेडाम व कु. शुभांगी तवरकर या विद्यार्थ्यांनी ओघवत्या शैलीत केले.  संचलनकर्त्यांनी  कार्यक्रमपत्रिकेनूसार इयत्ता २री ते ७वी तील विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक जीवनकार्यावर  प्रकाश टाकणारी भाषणे केली. यात इयत्ता २रीतील कु.निधी सोनटक्के, कु.नियती सोनटक्के, कु. गौरी भरकड, हर्ष भोयर इयत्ता ३रीतील श्रीहर्षा कराळे, रूद्र पावडे, रोहन मन्ने इयत्ता ४थीतील अनुष्का कराळे इयत्ता ५वीतील रोहन मेश्राम, तन्वी तवरकर, इयत्ता ६वीतील कांचन भोयर इयत्ता ७वीतील शुभांगी तवरकर या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यानंतर इयत्ता ६वीतील कु. कांचन भोयर कु. त्रिशा गेडाम, कु.अमिता नैताम, कु.अक्षरा कराळे, कु.पल्लवी पेंदोर, कु.समिक्षा आडे या  विद्यार्थिनींनी परिनिर्वाणगीत सादर केले. शेवटी प्रमुख पाहुणे पायल पिलवंड व कार्यक्रमाची अध्यक्षा कु. त्रिशा गेडाम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभाप्रदर्शन कु.तन्वी तवरकर हिने केले व अध्यक्षांच्या वतीने बालसभेचा समारोप झाल्याचे जाहिर केले.
       शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श कार्यक्रमाचे सर्व सोपस्कार उत्कृष्टप्रकारे पार पाडून बालसभेचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती व मातापालकसंघ सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेऊन   कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबाबत  शाळेचे मु.अ. शरद कुरूंदकर, सहशिक्षक अंकुश राऊत, सहशिक्षिका प्रितम पाटील, धनरेखा सांगवीकर  तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कमठाला ग्रामपंचायतच्या सरपंच अनुसयाबाई तडसे, शिवाजी पाटील कराळे, भास्कर पाटील कराळे, परमेश्वर भोयर, संतोष भरकड तसेच  शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मातापालकसंघ सदस्य आदिनी या विशेष उपक्रमाचे कौतूक करून अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Pages