नागरिकत्व कायद्याच्या विरोधात औरंगाबाद येथे आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 December 2019

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात औरंगाबाद येथे आंदोलन

दिल्लीत जामिया मिल्लिया विद्यापीठात  विद्यार्थ्यांवर लाठीमार;
औरंगाबादमध्ये   डाॅ.आंबेडकर विद्यापिठात उमटले प्रतिसाद.

औरंगाबाद : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या दिल्लीतील जामिया मिल्लिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद औरंगाबादेतही उमटले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी शैक्षणिक विभाग आणि अभ्यासिका बंद  ठेवून निषेध केला. जामियातील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आरएसएसप्रणित असल्याचा आरोप करत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला काळे फासले. दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठ बंद पुकारला. आंदोलक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विभाग, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद केल्या. आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍याने प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आणि जमाव न करण्यास बजावले. त्यामुळे विद्यापीठात काही वेळ तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Pages