"सीएबी"व "एनआरसी" विरोधात मुस्लिम समाजाचा माहुरात भव्य मोर्चा.
माहूर : शहर व तालुक्यातील मुस्लिम समुदायाच्या वतीने आज(दि.१६) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा बिलाच्या विरोधात व बिल वापस घेण्यासाठी तसेच केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी या शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून तहसीलदार, माहूर यांना निवेदन दिले. हजरत टिपू सुलतान चौक नई आबादी पासून सुरुवात झालेल्या शांतता मोर्चाची सांगता तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रगीताने झाली.
No comments:
Post a Comment