जिल्हा परिषद वाडीपुयड शाळेत उत्साहात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
अनेक माजी विदयार्थ्यानी शाळेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता.
नांदेड : वाजेगाव बिटमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीपुयड( जुने )येथे रविवार १५ डिसेबंरला शाळेच्या मैदाणात टेंटमंडप, ढोलताशा व ध्वनिक्षेपकाच्या मदतीने माजी विदयार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
जि.प.नांदेडचे मुकाअ मा. अशोक काकडे यांच्या कल्पनेतुन, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या प्रेरणेतुन भागशिक्षणधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीपुयड येथील असंख्य माजी विदयार्थ्यानी या कार्यक्रमास उपस्थीत राहुण शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शाळेला मदतही केली.
मेळाव्याच्या अथ्यक्षस्थानी सरपंच विजय पाटील कदम तर मार्गदर्शक केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, केद्रीय मुअ बालाजी गाढे तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील दिलीप पाटील कदम, अवधुत दिगबंर गीरी, मुअ. सौ संगीता कदम, तंञस्नेही शिक्षक अक्षय ढोके, औरंगाबाद खंडपिठाचे लिपीक अशोक तारू, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर तारू, गणेश कदम, माधव कदम, आनंद पुयड, लक्ष्मण तारू, राधाबाई तारू ह्या होत्या.
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील याना श्रध्दाजंली वाहण्यात आली.
सर्व मान्यवरांचे व उपस्थीत सर्व माजी विदयार्थ्यांचे वाचनीय पुस्तक व गुलाबपुष्प देउन स्वागत करण्यात आले. मुलीनी काढलेल्या सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय गादेवार यांनी केले. शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी कु.कोमल खानसोळे, गायञी कदम, अविनाश पुयड, अशोक तारू,आनंद पुयड, लक्ष्मण तारू, गंगाधर तारू यानी नोकरी/धंद्यातून वेळ काढून पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आले. यावेळी त्यांनी शाळा व आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकाप्रती ऋण व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या स्मृतींना उजाळा देतच त्यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शाळेला भरीव आर्थिक मदत करण्यास ते विसरले नाहीत.
स्वतःसारखेच आपल्या शाळेतील विदयार्थी येशोशिखरावर जावेत म्हणून आपला खारीचा वाटा उचलला. या विद्यार्थ्यांनी हृदयाच्या कप्प्यातील आठवणींना आपल्या मनोगतातून वाट करून दिली. खुप वर्षानंतर एकत्र आल्याने काहींचे डोळे भरून आले होते, आनंदाश्रू तरळत होते. त्यांनी यापुढेही अशीच शाळा विकासासाठी भरभरून मदत करणार असल्याचे जाहीर केले. व शाळेशी जोडलेली नाळ अशीच कायमस्वरूपी जिवंत ठेवणार असल्याचे मनोगतात सांगितले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेस मदत करताना रुपयांच्या रुपातच न करता वस्तूदान, समयदान व श्रमदान रुपात करावे आपणास जे कला, कौशल्य प्राप्त आहे ते या शाळेतील मुलांना लाभ द्यावा असे आवाहन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले. तंञस्नेही अक्षय ढोके यानी इंग्रजी शाळेच्या तुलनेत जि प शाळेचे महत्व विषद केले. दत्तप्रसाद पांडागळे यानी जिप शाळेतील शिक्षक व शिक्षण दर्जेदार असुन भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगीतले व शाळेला पाणी फिल्टर आणी प्रोजेक्टरसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.सौ.संगीता कदम व मुअ बालाजी गाढे यानीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सरपंच विजय पाटिल कदम यानी शाळेतील सर्व विदयार्थ्यांसाठी पाणीफिल्टर देण्याचे मान्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तप्रसाद पांडागळे तर आभार मुख्याध्यापक यशवंत सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सविता पत्की, मेघा पोलावार, सुवर्णा मामीडवार व मिलिंद तारु(मदतनीस) यांनी विशेष परीश्रम घेतले.

तुमच्या तंत्रप्रतिभेचा आणि निरपेक्ष तत्परतेचा अभिमान वाटतो.
ReplyDeleteधन्यवाद आणि शुभेच्छा.
मनस्वी आभार साहेब !
ReplyDelete