मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना लवकरच जिल्हास्तरावर
मुंबई: महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून जनताहिताचे निर्णय घेण्याचा धडाका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरूचं ठेवला आहे. त्यातचं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील रूग्णांची गैरसोय होऊ नये. यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना जिल्हास्तरावर करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. हा निर्णय झाल्यास रुग्णांचा वेळ, पैसा, श्रम, वाचण्याची शक्यता आहे.
रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मंत्रालयाचे खेटे मारावे लागतात, यात वेळ, पैसा, श्रम खर्च होतो. रुग्णांना तात्काळ उपचार मिळाला नाही, तर मृत्यूच्या दारात उभा असतो. जिल्हास्तरावर वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केल्यास रुग्णांना लवकर उपचार मिळेल.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील रुग्णांना या दोन ठिकाणी आपला अर्ज दाखल करता येतो.

No comments:
Post a Comment