अण्णाभाऊंचे साहित्य : उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखविणारे - के.मूर्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 December 2019

अण्णाभाऊंचे साहित्य : उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखविणारे - के.मूर्ती


अण्णाभाऊंचे साहित्य : उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखविणारे - के.मूर्ती 

आदिलाबाद  : अण्णाभाऊंचं समग्र साहित्यच समाज परिवर्तनासाठी असून उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखविणारे, समाजाला नव्या दिशेने घेऊन जाणारे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारे साहित्य आहे. मात्र, त्यांच्या साहित्याकडे समीक्षकांनी पाठ फिरवून उपेक्षाच केली, अशी खंत माजी नगराध्यक्ष के.मूर्ती यांनी व्यक्त केली.

        शाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त तेलंगाना राज्यातील व आदिलाबाद जिल्ह्यातील जुन्नी गावात साहित्य सम्राट अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तींच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेवराव कांबळे हे होते. पुढे बोलतांना के.मूर्ती म्हणाले की, अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्त देश-विदेशात त्यांची जयंती व्यापक स्वरूपात साजरी होत असतांना, जुन्नी सारख्या छोट्या गावात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे कौतुकास्पद आहे. अण्णाभाऊंचे साहित्य प्रादेशिक तथा विदेशी भाषेत अनुवाद होणे गरजेचे आहे. आज दलितांवर अन्याय व अत्याचार वाढत असल्यामुळे, सर्वांनी एकजुटीने त्याचा प्रतिकार करीत समाजाचा विकासासाठी झटणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसआरपीएसचे कुडालस्वामी, नृसिंह मोरे, बालाजी कांबळे, सरपंच माधव गुट्टे, वासुदेव लांबटिळे, झेडपीटीसीच्या सुभद्राबाई कदम, डी.के.कांबळे, राजकुमार गोपले, सूर्यकांत भटलाळे, गणेश गायकवाड आदींनीही मनोगत व्यक्त केले.

      प्रारंभी अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुष्पपूजन तथा माला अर्पण केल्यानंतर के.मूर्ती, नामदेवराव कांबळे व माधव गुट्टे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मूर्तीकार लक्ष्मण बोरीग्राम यांना मान्यवरांच्या हस्ते शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश मेकाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश कांबळे यांनी मानले. याप्रसंगी उपसरपंच परमेश्वर नारायण मास्तर, मन्नूर विनोद, नृसिंह कारपेंटर, रामराव भंडारे, रामचंद्र गुट्टे, शंकर देवकते, रामलू कोत्तूरवार, रवी उप्परवार, मधुकर घोडके, सी.लछमन्ना, भागोजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे प्रमुख देवीदास डोंगरे, मधुकर देवकांबळे, व्यंकट, दीपक, कोंडीराम, गोविंद जनार्धन, माधव सूर्यवंशी, चंद्रकांत नामवाड, राजू गायकवाड, राजेंद्र कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

1 comment:

Pages