खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली आणि नांदेड मध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली व नांदेड जिल्ह्यात (दि. १६ ) आरोग्य शिबीर, दिव्यांग तपासणी , रक्तदान शिबीर , रुग्णानं फळे वाटप , क्रिकेट स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना गणवेश ,शालेय साहित्य ,निबंध स्पर्धा ,नेत्र तपासणी वृक्षारोपण ,अभिषेक अश्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून परिचित असलेले व हिंगोली लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार व ज्यांनी आपला राजकीय प्रवास शाखा प्रमुख, शिवसेना विद्यार्थी संघटना प्रमुख,नांदेड दक्षिण चे आमदार,व हिंगोली लोकसभेचे खासदार असा प्रदीर्घ करून राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दिनांक १६ डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली मतदार संघ आणि नांदेड शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . नांदेड शहरात सकाळी १० वाजता शिवधारा अर्बनच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन , नवा मोंढा येथे बिच्छू स्वामी यांच्या वतीने गरजू महिलांना साड्या वाटप आणि रक्तदान शिबिराचे सकाळी ११. ३० वाजता नियोजन करण्यात आले आहे . तसेच विविध ठिकाणी खासदार हेमंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
हिंगोली मतदार संघात ही भरगच्च कार्यक्रम कळमनुरी,हिंगोली, औंढा, किनवट, माहूर, वसमत, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव येथे आयोजित केले आहेत . जोतिर्लिंग औंढा नागनाथ येथे आमदार संतोष बांगर ,माजी खासदार शिवाजी माने , सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे , दिलीप घुगे यांच्याकडून श्रीफळ व दुध अभिषेक करण्यात येणार आहे. नरसी नामदेव येथे रुग्णांना फळे वाटप आणि नामदेव महाराजाना अभिषेक , हिंगोली मध्ये महावीर भवन येथे हिंगोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने पोवाडा व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन,हिंगोली येथील डॉ. प्रतीक दोडल यांच्या रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी,अनाथ मुलाच्या सेवासदन मध्ये मुलांना कपडे आणि बुटाचे वाटप,खटकळी येथून हिंगोली शहरात मोटार सायकल रॅली,ओमप्रकाश देवडा अंध विद्यालयात विद्यार्थ्याना भोजनदान,आणि हिंगोली शासकीय रुग्णालयात फळे वाटप,करण्यात येतील.तर सेनगाव मध्ये सुद्धा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन व मोफत नेत्र तपासणी आणि आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना संसारउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे .
सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विध्यार्थ्यांना वह्या आणि पेन चे वाटप सेनगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे .तर हिंगोली जिल्हा समन्वयक दिलीप बांगर यांच्या वतीने पुसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप करण्यात येईल.औंढा नागनाथ येथील आदिवासी आश्रम शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन आणि नागनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे औंढा नागनाथ शिवसेनेच्या वतीने कळविले आहे. कळमनुरी येथील मूकबधिर शाळेत मुलांना आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप आणि ग्रामदैवत चिंचाळेश्वराला अभिषेक करण्यात येईल.
उमरखेड येथे उपजिल्हा प्रमुख बळीराम मुटकुळे तालुका प्रमुख सतीश नाईक ,व शहर प्रमुख यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात येईल हदगाव आणि हिमायतनगर येथे सुद्धा रुग्णांना फळे वाटप करून खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल.तर किनवट आणि माहूर येथे सुद्धा रक्तदान शिबीर आणि रुग्णानं फळे वाटप करण्यात येतील .मतदार संघात ठिकठिकाणी सत्कार आणि अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ,अशी माहिती खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांनी दिली.
No comments:
Post a Comment