किनवट येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी शिबिरास सुरवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 December 2019

किनवट येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी शिबिरास सुरवात

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध
साधने व संसाधने मोफत वाटपासाठी तपासणी शिबीरास उत्साहात प्रारंभ 

किनवट :
     मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी (चि) येथे रविवारी ( दि. १५ ) सकाळी साडेनऊ वाजता 'दिव्यांगा व सेवाज्येष्ठ नागरिकांसाठी विविध
 साधने व संसाधने मोफत वाटपासाठी तपासणी शिबीरास' उत्साहात प्रारंभ झाला. दिव्यांग व वयोश्री एक हजार नऊशे पंचेवीस जणांची तपासणी करण्यात आली.
             भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, राष्ट्रीय वयोश्री योजना, भारतीय कृत्रिम अंग निर्मान निगम , नांदेड जिल्हा प्रशासन,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र  व जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजने अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत विविध साधने व संसाधने वाटपासाठी दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
             आमदार भिमराव केराम , समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, अलिम्को मुंबईचे समन्वयक डॉ.संदीपकुमार, समाजकल्याणचे समन्वयक शशिकांत पांपटवार, मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचे हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण व दीपप्रज्वलनाने शिबीरास प्रारंभ झाला. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रामबुसमवार यांनी आभार मानले.
             अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शिबीर स्थळी भेट देऊन दिव्यांगासाठी धडपडणाऱ्यांच्या पुण्य कर्माचं कौतुक केलं. या शिबारातील तपासणीनंतर अस्थिव्यंगासाठी तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव, व्हील चेअर, कुबड्या, सर्व प्रकारच्या काठ्या, सी.पी. चेअर, वॉकर, मतीमंदासाठी एम.आर. कीट, अंधांसाठी स्मार्ट केन, डेसी प्लेअर, ब्रेल किट, स्मार्टफोन, कर्णबधिरांसाठी श्रवण यंत्र आणि सेवाज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत श्रवणयंत्र, दातांची कवळी, सर्व प्रकारच्या काठ्या, चष्मे, व्हील चेअर असे विविध साधने व संसाधने मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
            पंचायत समिती, किनवट येथे स्थापित दिव्यांग नोंदणी कक्षात  नोंदणी कामासाठी पी.जी. कांबळे, एम.बी.वायकुळे, के.डी. तोडकर व एस.व्ही. बनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तिथे बाराशेच्या क्र दिव्यांगांची नोंदणी झाली होती. शिबीर स्थळी ऐनवेळी नऊशे लोकांनी नोंदणी करून तपासणी करून घेतली. शिबीराचे नोडल अधिकारी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख , तालुका समन्वयक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे, सहायक शिबीरप्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी शिबीराचे सनियंत्रण केले.
            शिबीरस्थळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अदा करण्यासाठी नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम व  माधव लोखंडे, आर.टी. मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वैद्यकीय अधिकारी शिबीर स्थळी कार्यरत होते.
            अलिम्कोचे अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. आशुतोष पॉल, डॉ. रुपेश जाधव, डॉ. विजय मार्कंड, ऑडिओलॉजिस्ट डॉ. राजकुमार यादव, डॉ. सुशिल सिंग, नेत्रतज्ज्ञ डॉ.मितेश शाह, दंततज्ज्ञ डॉ. अनिल देवसरकर, डॉ.आश्विनी देवसरकर, डॉ.मनीष आष्टेकर आणि त्यांचे नऊ सहायक तपासणीसाठी पूर्ण होते. तपासणीनंतर ऑपरेटर यांनी डाटा एंट्री केली.
            प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुके, पंचायत समिती सभापती कलाबाई नारायण राठोड, उपसभापती गजानन कोल्हे पाटील, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले आदि मान्यवरांनी भेट देऊन शिबीर नियोजनाचं कौतुक केलं.
         आयोजनासाठी तहसिल कार्यालय,पंचायत समिती, आरोग्य विभाग, बालविकास विभाग, नगर परिषदचे  अधिकारी -कर्मचारी, विविध आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहायक,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे शिक्षक यांचेसह बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. पंजाब शेरे व प्रा.सुलोचना जाधव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कार्यरत होते.
         शिबीराच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी डी.एल. उडतेवार, सुदर्शन मेश्राम, एस.एस. पाटील,एस.आर. शिंदे, विठ्ठल श्रीमनवार, बी.एस. इबीतदार, पी.जी. कांबळे, एम.बी.वायकुळे, केशव डहाके, बी.एम. अस्वले, के.डी. तोडकर, ए.व्ही. बनकर आदिंनी परिश्रम घेतले.
 दि. १६ पर्यंत हे शिबिर असल्याने लाभार्थ्याने लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages