राष्ट्रीय लोकअदालत:विस्कटलेले पाच संसार जुळविले,४६ प्रकरणे सामंजस्याने सोडवीले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 December 2019

राष्ट्रीय लोकअदालत:विस्कटलेले पाच संसार जुळविले,४६ प्रकरणे सामंजस्याने सोडवीले

राष्ट्रीय लोकअदालत: विस्कटलेले पाच संसार जुळविले, ४६ प्रकरणे सामंजस्याने सोडवीले

किनवट  :  तालुका विधी सेवा समिती व वकीलसंघाच्या वतीने शनिवारी (दि.१४) येथील न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पाच जोडप्यांचे विस्कटलेले संसार जुळविण्यात आले. या दांपत्यांचा न्यायाधीश जहांगीर पठाण व सहदिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव यांच्या हस्ते आहेर देऊन भावपूर्ण सत्कार करण्यांत आला. तसेच या लोक अदालतीमध्ये १९ प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी व २७ बँक व वीज वितरण विभागाचे दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ४६ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आलीत. दाखलपूर्व २७ प्रकरणांमध्ये झालेल्या तडजोडीतून एकूण १८ लक्ष ५२ हजार ८२० रुपयांची तडजोड रक्कम संबंधितांना मिळाली.

       दोन पॅनलमध्ये झालेल्या लोकअदालतीमध्ये पहिल्या पॅनलचे प्रमुख म्हणून न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी, तर सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष के.मूर्ती व अ‍ॅड.सूनयना सिडाम यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलचे प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव यांनी, तर सदस्य म्हणून माजी प्राचार्य वि.मा.शिंदे व अ‍ॅड.गजानन पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सरकारी वकील अशोक पोटे, सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.चव्हाण ,किनवट न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पंजाब गावंडे, उपाध्यक्ष अ‍ॅड.मिलिंद सर्पे व सचिव अ‍ॅड.दिलीप काळे यांचेसह अ‍ॅड.शंकर राठोड, अ‍ॅड.अनंत वैद्य, अ‍ॅड.अरविंद चव्हाण, अ‍ॅड.विजय चाडावार, अ‍ॅड.यशवंत गजभारे, अ‍ॅड.दिलीप कोट्टावार, अ‍ॅड.एस.एस.ताजणे, अ‍ॅड.उदय चव्हाण, अ‍ॅड.संतोष नेम्मानीवार, अ‍ॅड.डी.एम.दराडे, अ‍ॅड.राहुल सोनकांबळे, अ‍ॅड.आकाश कोमरवार, अ‍ॅड.टी.एच.कुरेशी, अ‍ॅड.पंकज गावंडे, अ‍ॅड.जे.बी.सिडाम, अ‍ॅड.के.के.मुनेश्वर, अ‍ॅड.व्ही.एस.शामिले, अ‍ॅड.कृष्णा राठोड, अ‍ॅड.एस.के.मुसळे, अ‍ॅड.एस.व्ही.अयतलवाड, अ‍ॅड.रूपेश पुरुषोत्तमवार, अ‍ॅड.बिपीन पवार, अ‍ॅड.ज्योती गिरी, अ‍ॅड.सचिन येरेकार, अ‍ॅड. सुनील सिरपुरे, संतोष जक्कुलवाड यांची उपस्थिती होती.

       तसेच या लोकअदालतीमध्ये विविध बँकेचे व वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात मुरलीकृष्णा, चव्हाण, चचरकर, देशमुख, ओमप्रकाश, मनवर, निर्दोष आडे, राकेशकुमार, शैलेश आढाव, ओ.एम.शेख, डी.डी.आडेकर, डी.के.सरकनवाड, आर.व्ही.दलाल, विनायक पेनकर, एस.टी.बावने, एस.एम.कनाके, व्ही.जे.ढगे यांची उपस्थिती होती.

        लोकअदालत यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी एस.जी.दोनकलवार, श्री. भोपळे तसेच न्यायालयीन कर्मचारी शिरीष चिटमलवार, एल.वाय.मिसलवार, डी.आर.भंडारे, एस.व्ही.चटलेवार, एस.के.म्याकलवार, एम.एम.कुलकर्णी, बी.एम.लोणे, शेख मगदूम, कान्हेकर, शेख शौकत यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages