साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 December 2019

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या

खासदाराने केलेल्या मागणीची पीएमओ कार्यालयाने दिली पोच

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या
नांदेड: येथील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना एक निवेदन पाठविले. इंग्रजी भाषेमध्ये  खासदार चिखलीकर यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव करत त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, खा. चिखलीकर यांनी या निवेदनावरचा जशाच्या तसा मजकूर असलेले पत्र त्यांच्या स्वत:च्या लेटरपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलं. त्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खा. चिखलीकर यांना 'आपलं पत्र मिळालं', असे इंग्रजीतून पत्र आले.

पंतप्रधान मोदी यांनी खा. चिखलीकरांच्या एका अर्थाने आमच्या पत्राची दखल घेतल्याने आम्हाला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदीच्या या पत्रामुळे सकारात्मक विचार होऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपा आनूसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारोतीराव वाडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवेदन देण्यासाठी पुढाकार घेतला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य लिहिले, ते जगातल्या अनेक देशांत पोहोचले. देशाचा गौरव वाढविणार्‍या त्यांच्या या साहित्यामुळे आपल्या देशातल्या युगपुरुष छत्रपती शिवरायांची किर्ती जगभर पोहोचली. साहित्यरत्न अण्णाभाऊंनी 'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहातावर वसली आहे', असा नवा सिध्दांत जगासमोर आणला.

एकूणच अण्णाभाऊंचं कार्य पातळीवरचे होते. त्यामुळे भारतरत्न देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. खा. चिखलीकरांनी हे निवेदन पंतप्रधांना पाठविणं आणि पंतप्रधानांचं उत्तर येणं, यावरुन अण्णाभाऊंना भारतरत्न हा किताब देण्यासाठी भारत सरकार पुढाकार घेईल, अशी आशा भाजपा आनूसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारोती वाडेकर यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

या निवेदनावर समाजाचे यूवा उद्योजक माधव डोम्पले, शिवसेनेचे यूवा नेते भारत सरोदे,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळू लोंढे,अरूण गारोळे, बालाजी गऊळकर, मनोज बोईवार, सतीष सुगावकर, किशन कांबळे, नागोराव आंबटवार, माधवराव उमरजकर, प्रेमानंद शिंदे, गुलाब बनसोडे, बाबूराव घोणशेटवाड, आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages