किनवट: उमरीबाजारच्या जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत बालक मेळावा घेण्यात आला.
बालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शाळेला लागणा-या भौतिक सुविधा पुर्ण करणे आणि विद्यार्थ्यांना ऊत्तम अध्यापन व्हावे यासाठी सर्व डिजिटल साहित्य व संगणकाची, ग्रंथालय व पुस्तके, वर्गखोल्या, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था अशा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस लागणा-या अनेक बाबीचे निवेदन ग्रामसेवक श्री राठोड साहेब यांना देण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवन कांबळे, उपाध्यक्षा सौ. वैशालीताई कोटरंगे, सदस्य गौतम ऊमरे, ग्राम पंचायत सदस्य धम्मपाल भगत, गुलाब कांबळे व सर्व शिक्षकवृंद ऊपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यामावार एम.एम., आर.बी.वाघमारे, एल.एल.आडे, कांबळे आर.डी., कांबळे डी.के., पवार एच.पी. आदिनी परिश्रम घेतले.
महात्मा फुले स्मृतीदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी शाळेत कार्यक्रम घेण्यात आले.
कें. प्रा. शाळा ऊमरी (बा) येथे म.फुले याची पुण्यतिथी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात आला. यानिम्मित्य विद्यार्थ्याच्या रांगोळी स्पर्धा, गायन, भाषण, वाचन व निबंध स्पर्धा घेण्यात आले. विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख शेरलावार यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment