निवडणुकांसाठी आता १९० मुक्त चिन्हे.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 11 December 2019

निवडणुकांसाठी आता १९० मुक्त चिन्हे..


निवडणुकांसाठी आता १९० मुक्त चिन्हे
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या १८ जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेनुसार ४८ मुक्त चिन्हे निश्चित करण्यात आली होती. त्यात आता ३० नोव्हेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार १४२ नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता १९० झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ), भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी (हातोडा विळा व तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी; तसेच जनता दल सेक्यूलर (डोक्यावर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पार्टी (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), लोक जनशक्ती पार्टी (बंगला), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुस्लिमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाच्या ३० नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार मुक्त चिन्हांची यादी (यातील ४८ क्रमांकापर्यंतची चिन्हे यापूर्वीदेखील होती): १) कपाट, २) ब्रश, ३) डिझेल पंप, ४) इस्त्री, ५) करवत, ६) तंबू, ७) फुगा, ८) केक, ९) विजेचा खांब, १०) जग, ११) कात्री, १२) व्हायेलीन, १३) टोपली, १४) कॅमेरा, १५) काटा, १६) किटली, १७) शिवणयंत्र, १८) चालण्याची काठी, १९) बॅट, २०) मेणबत्ती, २१) कढई, २२) शटल, २३) शिटी, २४) फलंदाज, २५) छताचा पंखा, २६) गॅस सिलेंडर, २७) पत्रपेटी, २८) पाटी, २९) विजेरी (टॉर्च), ३०) कोट, ३१) काचेचा पेला, ३२) मका, ३३) स्टूल, ३४) फळा, ३५) नारळ, ३६) हार्मोनियम, ३७) नगारा, ३८) टेबल, ३९) पाव, ४०) कंगवा, ४१) हॅट, ४२) अंगठी, ४३) टेबल लॅम्प, ४४) ब्रिफकेस, ४५) कपबशी, ४६) आईसक्रीम, ४७) रोड रोलर ४८) दूरदर्शनसंच, ४९) एअर कंडिशनर, ५०) सफरचंद, ५१) ऑटो रिक्षा, ५२) पांगुळ गाडा, ५३) मण्यांचा हार, ५४) पट्टा, ५५) बाकडे, ५६) सायकल पंप, ५७) दुर्बिण, ५८) बिस्किट, ५९) होडी, ६०) पुस्तक, ६१) पेटी, ६२) ब्रेड टोस्टर, ६३) विटा, ६४) बादली, ६५) बस, ६६) गणकयंत्र, ६७) ढोबळी मिर्ची, ६८) गालिचा, ६९) कॅरम बोर्ड, ७०) खटारा, ७१) फुलकोबी, ७२) सीसीटीव्ही कॅमेरा, ७३) साखळी, ७४) जाते, ७५) पोळपाट लाटणे, ७६) बुद्धिबळ, ७७) चिमणी, ७८) चिमटी/ क्लिप, ७९) नारळाची बाग, ८०) रंगाचा ट्रे व ब्रश, ८१) संगणकाचा माऊस, ८२) संगणक, ८३) क्रेन, ८४) घन ठोकळा, ८५) हिरा, ८६) डिश अँन्टेना, ८७) दरवाज्याची घंटी, ८८), दरवाज्याची मूठ, ८९) ड्रील मशीन, ९०) डंबेल्स, ९१) कानातले दागिने (कर्णफुले), ९२) लिफाफा, ९३), एक्सटेंशन बोर्ड, ९४) बासुरी, ९५) फूटबॉल, ९६) कारंजे, ९७) नरसाळे, ९८) ऊस, ९९) भेट वस्तू, १००) आले, १०१) चष्मा, १०२) द्राक्षे, १०३) हिरवी मिरची, १०४) हात गाडी, १०५) हेड फोन, १०६) हेलिकॉप्टर, १०७) हेल्मेट, १०८) हॉकी, १०९) वाळूचे घड्याळ, ११०) पाणी गरम करण्याचे हिटर, 111) फणस, ११२) चावी, ११३) भेंडी, ११४) लॅपटॉप, ११५) कडी, ११६) लाईटर, ११७) ल्यूडो, ११८) जेवणाचा डब्बा, ११९) काडेपेटी, १२०) माईक, १२१) मिक्सर, १२२) नेल कटर, १२३) गळ्यातील टाय, १२४) कढई, १२५) भूईमुग, १२६) पेर, १२७) वाटाणे, १२८) पेन ड्रॉईव्ह, १२९) पेनाची नीब, १३०) पेन स्टॅंड, १३१) कंपास पेटी, १३२) पेन्सिल शार्पनर, १३३) खलबत्ता, १३४) पेट्रोल पंप, १३५) फोन चार्जर, १३६) उशी, १३७) अननस, १३८) प्लास्टर थापी, १३९) जेवणाची थाळी, १४०) घागर, १४१) पंचिंग मशीन, १४२) फ्रिज, १४३) रूम कुलर, १४४) रबरी शिक्का, १४५) सेफ्टी पीन, १४६) करवत, १४७) शाळेची बॅग, १४८) स्कुटर, १४९) बोट, १५०) शटर, १५१) शितार, १५२) दोरी उडी, १५३) साबण, १५४) मोजे, १५५) सोफा, १५६) पाना, १५७) स्टॅप्लर, १५८) स्टेथोस्कोप, १५९) स्टम्प, १६०) सूर्यफूल, १६१) झोका, १६२) स्वीच बोर्ड, १६३) इंजेक्शन, १६४) टीव्ही रिमोट, १६५) टॅक्सी, १६६) चहाची गाळणी, १६७) दूरध्वनी, १६८) भाला फेकणारा, १६९) नांगर, १७०) चिमटा, १७१) दातांचा ब्रश, १७२) दातांची पेस्ट, १७३) टॅक्टर, १७४) बिगूल, १७५) तुतारी, १७६) टाईप रायटर, १७७) टायर्स, १७८) छत्री, १७९) वॅक्यूम क्लिनर, १८०) वॉल हूक, १८१) पाकिट, १८२) अक्रोड, १८३) कलिंगड, १८४) पाण्याची टाकी, १८५) विहीर, १८६) पवन चक्की, १८७) खिडकी, १८८) सूप, १८९) कॅन आणि  १९०) लोकरीचा गुंडा व सुई.
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages