आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन २९ डिसेंबर रोजी नांदेड येथे आयोजन
नांदेड: सत्यशोधक विचार मंच च्या वतीने फुले शाहू आंबेडकर प्रेरणेचे १९ वे आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन रविवार २९ डिसेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती विचार मंच चे अध्यक्ष कोंडदेव हाटकर , संयोजक गंगाधर ढवळे यांनी दिली आहे .
सदरील साहित्य जागराचा कार्यक्रम लेबर कॉलनी येथील शुभारंभ मंगल कार्यलय येथे आयोजित करण्यात येणार आहे . या सम्मेलनात परिसंवाद ,कथाकथन, कविसम्मेलन साहित्यिकांचा-पुरस्कार आदी कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे सम्मेलनाच्या नियोजन संदर्भात एन डी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विविध निवडी करण्यात आल्या यामध्ये सम्मेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून यशवंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा इतिहासतज्ञ प्रा. डॉ. उत्तम सावंत ,निमंत्रक शल्यचिकित्सक डॉ. राजेश पंडित , संयोजन समिती अध्यक्ष धम्मानंद कांबळे आदींची निवड करण्यात आली.
बैठकीस विचर्मनाच चे सचिव श्रावण नरवाडे , ऍड जयप्रकाश गायकवाड ,डॉ. रामचंद्र वनंजे , एन. टी. पंडित ,राज गोडबोले , रमेश कसबे, दिलीप कदम, ज्ञानोबा दुधमल ,एन. एन. झडते ,संजय जाधव , संजय जाधव ,एन. डी .जोंधळे ,प्रभू ढवळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment