सोनारीफाटा येथे एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 12 December 2019

सोनारीफाटा येथे एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

सोनारी फाटा येथे एकदिवसीय तिसर्‍या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण नांदेड द्वारा आयोजित एकदिवसीय तिसर्‍या बौद्ध धम्म परिषदेचे २२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

       कार्यक्रमास पुज्यनिय भन्ते सुभूती, तपोवन लहान यांची धम्मदेशना, मान्यवरांचा गौरव व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका नंदा नांदरेकर (मुंबई), उमा भारती (मुंबई), रेखा भारती (औरंगाबाद), भारतीताई राऊत (परभणी), अंजलीताई घोडगे (लातूर), कल्याणीताई कोकरे (वारंगा), महानंदा वाघमारे (औरंगाबाद), माया खिल्लारे, कल्पना खिल्लारे (नांदेड) तसेच गायक बाबुराव गाडेकर, माधव वाढवे, दिनकर लोणकर, रविराज भद्रे, छोटाराजा सिद्धार्थ अंबाडीकर, विकासराजा गायकवाड, विजयभाऊ खंदारे यांचा सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.

         या धम्म परिषदेसाठी आंबेडकरी विचारवंत, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार असून या बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती संयोजक त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर, निमंत्रक जोगेंद्र नरवाडे (माजी सभापती), आयोजक डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव मा. भवरे, बापूराव जमदाडे, नरेंद्र दोराटे, जगन्नाथ नरवाडे, सचिनभाऊ कांबळे, सुभाष गुंडेकर, कानबा पोपलवार, संजय मुनेश्‍वर, शेख खय्युम, डॉ. सारीपुत्र गोखले, प्रकाश कदम, शिवाजी डोखळे, नागोराव मेठेवाड, धम्मा वाढवे, गौतम राऊत, राहुल लोणे, संघपाल कांबळे, बसवंत कांबळे, अविनाश कदम, गणपत नाचारे यांनी दिली.

     बौध्द  धम्म परिषदेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगांवकर, नांदेडच्या माजी महापौर शिलाताई भवरे, प्राचार्य मोहन मोरे, श्रीमती सुमनबाई भवरे, सिनेअभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पी.बी. नामवाड, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, शिलवंत वाढवे, उत्तम कानिंदे, कैलास माने पोटेकर, शाहीर चंद्रकांत धोटे, भीमराव कावळे सिरंजनीकर यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages